1971 च्या युद्धावर आधारित ‘पिप्पा’ चित्रपटामध्ये ईशान खट्टर मुख्य भूमिकेत; चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्ताने अभिनेता ईशान खट्टर आणि अभिनेत्री मृणाल ठाकुरचा आगामी ‘पिप्पा’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट देशभक्तीवर आधारित असून या चित्रपटाच्या टीझरचा खूप धमाकेदार असल्याचं दिसून येत आहे. या चित्रपटामध्ये 45 व्या कॅवलरी टँक स्क्वाड्रन च्या एका दिग्गज ब्रिगेडियर बलराम सिंह मेहता यांच्या शौर्यगाथेवर आधारित आहे. या चित्रपटाची कथा ब्रिगेडियर बलराम सिंह मेहता यांच्या ‘द बर्निंग चाफीस’ यांच्यावर आधारित आहे.

‘पिप्पा’ चित्रपटाचा हा टीझर अभिनेत्री मृणाल ठाकुर आणि अभिनेता ईशाम खट्टर यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या चित्रपटामध्ये दोघेही मुख्य भूमिकेत दिसून येतील. हा टीझर 1 मिनिट 7 सेकेंदाचा असून यामध्ये 3 डिसेंबर 1971 रोजी संपूर्ण देशाचे जवान आणि संपूर्ण देशातील नागरिक रोडिओवर देशाच्या तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना ऐकत असतात, त्यावेळी त्या म्हणतात की, “काही तासांपूर्वी पाकिस्तानने भारतीय एअरफीट्सवर हवाई हमला केला आहे. मी भारताची प्रधानमंत्री इंदिरा गांधी, पाकिस्तानसोबत युद्धाची घोषणा करते. जय हिंद..”

या दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित

हा चित्रपट 2 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार असून यामध्ये युद्धा सोबतच ईशान आणि मृणालची केमिस्ट्री सुद्धा पाहायला मिळणार आहे. राजा कृष्ण मेनन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून यामध्ये ईशान खट्टर 45 व्या कॅवलरी टँक स्क्वाड्रनचे दिग्गज ब्रिगेडियर बलराम सिंह मेहता यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. बलराम सिंह मेहता यांनी 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान 12 दिवसांची लढाई लढली होती. पिप्पा हा चित्रपट याचं लढाईवर आधारित असणार आहे.


हेही वाचा :बॉलिवूड कलाकारांनी देखील साजरा केला स्वातंत्र्य दिवस; शाहरूख-सलमानसोबत फडकावला तिरंगा

First Published on: August 15, 2022 1:48 PM
Exit mobile version