The Kashmir File : विवेक अग्निहोत्रीला ‘ द कश्मीर फाईल’ सिनेमा बनवण्यासाठी लागले 4 वर्ष, फतवाही काढला होता

The Kashmir File : विवेक अग्निहोत्रीला ‘ द कश्मीर फाईल’ सिनेमा बनवण्यासाठी लागले 4 वर्ष, फतवाही काढला होता

विवेक अग्नीहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाईल्स हा सिनेमा सध्या बॉलिवूडमध्ये फार कमी वेळात प्रचंड लोकप्रियता मिळवत आहे. सिनेमा प्रेक्षकांपर्यंत आणण्यासाठी दिग्दर्शकांना प्रचंड मेहनत घ्यावी लागली. काश्मीर फाइल्स सारखा गंभीर विषय सिनेमातून मांडणे हा खरतर त्यांच्यासाठी एक मोठा टास्क होता.  तीन दिवसात  सिनेमाने तगडी कमाई केली आहे. दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री आणि त्यांची पत्नी पल्लवी जोशी रविवारी गुरुग्रामच्या स्टार मॉल PVRमध्ये सिनेमा पाहण्यासाठी पोहोचले होते. त्यावेळी प्रेक्षकांनी त्यांचे मनभरुन कौतुक केले तेव्हा संवाद साधताना सिनेमाविषयी महत्त्वाची माहिती दिली. द काश्मीर फाइल्स सिनेमासाठी चार वर्ष लागल्याचा खुलासा दिग्दर्शकांनी यावेळी केला.

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यावेळी म्हणाले, काश्मीरी पंडितांचे दुख: सिनेमातून फार इमानदारीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचे होते. त्यामुळे आम्ही या विषयावर सिनेमा बनवण्याचे ठरवले. त्यानंतर पत्नी पल्लवी जोशी म्हणाली, जेव्हा देशाचे सैनिक मोठ्या बहादुरीने देशसेवा करुन देशाचे रक्षण करू शकतात तर आपणही देशाची सेवा करू शकतो. आणि याच उत्साहात आम्ही सिनेमाच्या निर्मितीला सुरुवात केली. जवळपास चार वर्ष या प्रोजेक्टवर तगडी मेहनत घेतली. मधला दोन वर्षाचा काळ कोरोना लॉकडाऊनचा असल्याने या दोन वर्षात सिनेमाचे शुटींग पूर्णपणे ठप्प झाले होते.

The Kashmir Files च्या यशावरील बॉलिवूडचे मौन पाहून कंगनाचा संताप, म्हणाली ‘यश पाहून सगळे गप्प’

काश्मीरमध्ये शुटींग करताना देखील अनेक संकटांचा सामना करावा लागला. आम्ही शुटींगसाठी काश्मीरमध्ये पोहोचलो तेव्हा तिथला दाल लेक पूर्णपणे गोठला होता. जेमतेम शॉर्ट शूट करायला मिळाले. त्यानंतर अनेक लोकांनी सिनेमाचे प्रदर्शन रोखण्यासाठी निदर्शने केली. परंतु सिनेमा रिलीज झाल्यानंतर त्याच प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे, असे दिग्दर्शक म्हणाले.

शुटींगच्या शेवटच्या दिवशी निघाला फतवा

निर्माती पल्लवी जोशी पुढे म्हणाली, सिनेमाची निर्मिती होत असताना पती विवेक आणि माझ्या विरोधात एक फतवा काढण्यात आला होता. शुटींगच्या शेवटी दिवशी हा फतवा काढण्यात आला. इतकेच नाही तर द काश्मीर फाइल्स सिनेमाचे शुटींग सुरू असताना आम्हाला अनेक धमक्यांचे फोन देखील आले होते.


हेही वाचा – The Kashmir Files वरून काँग्रेसने ट्विट करत BJPवर साधला निशाणा

First Published on: March 14, 2022 4:13 PM
Exit mobile version