The Kashmir Files च्या यशावरील बॉलिवूडचे मौन पाहून कंगनाचा संताप, म्हणाली ‘यश पाहून सगळे गप्प’

कंगना राणौत सध्या तिच्या लॉक अप या रिअॅलिटी शोमुळे देखील विशेष चर्चेत आहे. 

Kangana Ranaut criticises Bollywoods pin drop silence on The Kashmir Files Chamche are in shock
The Kashmir Files यशावरी बॉलिवूडच्या मौन पाहू कंगनाचा संताप, म्हणाली 'यश पाहून सगळे गप्प'

आपल्या स्पष्टवक्तेपणा आणि धाडसी विधानांमुळे बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत चांगलीच चर्चेत असते. कंगनाने अलीकडेच अलिया भट्टच्या गंगुबाई काठियावाडी चित्रपटाविरोधात जोरदार वक्तव्य केल होतं. आता तिने नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावर भाष्य केलं आहे. ‘The Kashmir Files’ हा चित्रपट या शुक्रवारी प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक रंजन अग्निहोत्री यांनी केले आहे. प्रदर्शनापासून या चित्रपटाची विशेष प्रशंसा केली जातेय. याच चित्रपटाचे कंगनाने कौतुक करत बॉलिवूडच्या मौनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

‘द कश्मीर फाइल्स’ रिलीज झाल्यानंतर सर्वत्र चित्रपटगृहांवर याच बोलबाल आहे. सुमारे 700 स्क्रीन्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे कौतुक आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केले आहे. काश्मिरी पंडितांच्या वेदना आणि परीक्षा सांगणारा या चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही विशेष पसंती मिळतेय. 11 मार्च रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने दोन दिवसांत सुमारे साडेअकरा कोटींची कमाई केली आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ची ज्या पद्धतीने चर्चा होत आहे, त्यावर बॉलिवूडचे मौन पाहून कंगना राणौतला धक्का बसला आहे.

कंगनाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिले की, , ‘कृपया द काश्मीर फाइल्स चित्रपटाबाबत फिल्म इंडस्ट्रीमध्ये असलेला पिन ड्रॉप सायलेन्स लक्षात घ्या. केवळ कंटेंटच नाही तर या चित्रपटाची कमाईही खूप चांगला आहे. इन्वेस्टमेंट आणि प्रॉफिटच्याबाबतील हा चित्रपट एक केस स्टडी आहे, हा चित्रपट सर्वात यशस्वी आणि फायदेशीर चित्रपट आहे.

कंगना राणौत म्हणाली की, ‘द काश्मीर फाईल्स चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये फक्त बिग बजेट चित्रपट किंवा व्हिज्युअल इफेक्टशी संबंधित चित्रपटचं चालतात हा भ्रम मोडीत काढला आहे.

विशेष म्हणजे ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट 90 च्या दशकात काश्मिरी पंडितांचा काश्मीरमधील संघर्ष आणि अडचणींवर आधारित आहे. या चित्रपटात अनुपम खेर आणि पल्लवी जोशी यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल चालू आहेत. कंगना राणौत सध्या तिच्या लॉक अप या रिअॅलिटी शोमुळे देखील विशेष चर्चेत आहे.


स्वत:ला कधी वाईट समजू नका; ट्रोलिंग, एकटेपणावर जॅकलिन फर्नांडिस व्यक्त