कधीकाळी 50 रुपये रोजंदारीवर काम करत होते जेठालाल

कधीकाळी 50 रुपये रोजंदारीवर काम करत होते जेठालाल

मागील अनेक वर्षांपासून हिंदी टेलिव्हिजन वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ प्रेक्षकांचं भरघोस मनोरंजन करत आहे. या मालिकेत जेठालाल ही मुख्य भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशींच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. यांच्या अभिनयाने मालिकेला चार चाँद लावले आहेत. मागील अनेक वर्षांपासून या मालिकेत काम करणारे दिलीप जोशी मालिकेसाठी लाखो रुपये चार्ज करतात. आज दिलीप जोशी यांचा आज 55 वा वाढदिवस आहे. त्यांनी वयाच्या 21 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

चित्रपटात काम करण्यासाठी मिळाले होते फक्त 50 रुपये

दिलीप जोशी यांनी सलमान खानच्या ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटात पहिल्यांदा काम केले होते. मात्र, त्यावेळी त्यांना फी म्हणून केवळ 50 रुपये मिळाले होते. आज करोडोंची संपत्ती असणाऱ्या दिलीप जोशींनी 1989 मध्ये बॉलिवूड चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. यावेळी त्यांना सलमानच्या ‘मैंने प्यार किया’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात त्यांनी रामू नौकर ही भूमिका साकारली होती. ज्यासाठी त्यांना 50 रुपये मिळाले होते.

मालिकेसाठी लाखो रुपये चार्ज करतात दिलीप जोशी

कधी काळी 50 रुपये फीस घेणारे दिलीप जोशी यांनी त्यांच्या करिअरमध्ये खूप स्ट्रगल केले. आज ते करोडोच्या संपत्तीचे मालक आहेत. आज ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेच्या एका एपिसोडसाठी जवळपास 1.5 कोटी चार्ज करतात. ते सध्या या मालिकेतील सर्वाधिक फीस घेणारे अभिनेते आहेत.

दरम्यान, दिलीप जोशी यांनी आत्तापर्यंत जवळपास ‘हमराज, दिल भी है हिंदुस्तानी’ , ‘खिलाड़ी 420’ यांसारख्या चित्रपटांमध्ये छोट्या-छोट्या भूमिका साकारल्या होत्या मात्र, हवं तसं यश त्यांना मिळालं नाही. 2008 मध्ये त्यांना ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेची ऑफर आली.


हेही वाचा :

22 वर्षानंतर ‘गदर 2’ मधून पुन्हा झळकणार अनोखी प्रेमकथा

First Published on: May 26, 2023 12:01 PM
Exit mobile version