Attack Teaser: जॉनच्या अटॅकचा टिझर आऊट! ‘या’ दिवशी होणार रिलीज

Attack Teaser: जॉनच्या अटॅकचा टिझर आऊट! ‘या’ दिवशी होणार रिलीज

John Abraham new Movie Attack teaser release

बॉलिवूडचा अँक्शन हिरो म्हणजेच अभिनेता जॉन अब्राहम पुन्हा एकदा त्याचा नवा अँक्शन सिनेमा प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. अटॅक ( Attack Teaser)  या नव्या सिनेमाचा टिझर रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमात जॉन एका सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचा धमाकेदार टिझर पाहून सिनेमाप्रती प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.  सिनेमाच्या टिझरमध्ये जॉन अब्राहम त्याच्या जुन्या अँक्शन मोडमध्ये परत आलेला पहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी जॉनचा सत्यमेव जयते २ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा जॉन त्याचा अँक्शन सिनेमा प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. सिनेमात जॉन अब्राहमसोबतच अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि रकुल प्रीत सिंह देखील असणार आहेत.

भारताच्या पहिल्या सुपर सोल्जरचे साक्षीदार होण्यासाठी तयार रहा, टीझर आऊट असे म्हणत सिनेमाचा टीझर जॉनने शेअर केला आहे. अटॅक हा सिनेमा  प्रजासत्ताक दिनाच्या आठवड्यात  २८ जानेवारी २०२२ला रिलीज होणार आहे. लक्ष्य राज आनंद यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केलेय. जॉनच्या अटॅक सिनेमाचा टीझर पाहून सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहे. हा सिनेमा हॉलिवूडला टक्कर देणारा असल्याचे नेटकरी म्हणत आहेत. संपूर्ण सिनेमात प्रेक्षकांना एक्शन आणि ड्रामा पहायला मिळणार आहे.

अभिनेता जॉन अब्राहमचं इन्स्टाग्राम अकाऊंटवरील सर्व फोटो आणि व्हिडिओ डिलीट करण्यात आलेत. त्यामुळे जॉनचे इन्स्टाग्राम अकाऊंट हँक झाल्याचे म्हटले जात होते. जॉनने याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. मात्र अटॅक सिनेमाचा टीझर त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केल्यानंतर सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. जॉनने त्याच्या अकाऊंटवरुन सिनेमाचा टीझर शेअर केल्यानंतर अकाऊंट हँकींग या केवळ अफवा असल्याचे समोर आले आहे. जॉनने सिनेमाच्या प्रमोशनसाठी हे केले असल्याचे म्हटले जात आहे.


हेही वाचा – वाढदिवसाच्या २ दिवस आधीच अभिनेता John Abraham चे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक, सगळ्या पोस्ट हॅकर्सकडून डिलीट

First Published on: December 15, 2021 5:48 PM
Exit mobile version