घरताज्या घडामोडीवाढदिवसाच्या २ दिवस आधीच अभिनेता John Abraham चे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक, ...

वाढदिवसाच्या २ दिवस आधीच अभिनेता John Abraham चे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक, सगळ्या पोस्ट हॅकर्सकडून डिलीट

Subscribe

जॉनकडून मात्र त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्याबाबत कोणताही माहिती नाही

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचे इन्स्टाग्राम अकाऊंट हँक झाले आहे. हँकर्सनी जॉनच्या इन्स्टाग्रामवरील सर्व पोस्ट डिलीट केल्या असून जॉनचे फॅन्स या प्रकाराने हैराण झाले आहेत. जॉन अब्राहम सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसला तरी त्याची प्रत्येक पोस्ट त्याच्या फॅन्सच्या पसंतीस उतरते. जॉनची सोशल मीडिया फॅन फॉलोव्हिंग प्रचंड आहे. जॉनचे इन्स्टाग्रामवर ९ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. जॉनच्या प्रत्येक पोस्टची फॅन्स आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र जॉनच्या इन्स्टाग्रामवरील सगळ्या पोस्ट डिलीट झाल्याने त्याला देखील मोठा धक्का बसला आहे. जॉनकडून मात्र त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्याबाबत कोणताही माहिती देण्यात आलेली नाही.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वीच म्हणजेच २५ नोव्हेंबरला जॉनचा सत्यमेव जयते २ हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाचे जॉनने सोशल मीडियावर जोरदार प्रमोशन केले होते. सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद दिला.  जॉनला इन्स्टाग्रामवर  ९ मिलियनहून अधिक लोक फॉलो करतात ज्यात अभिनेत्री आलिया भट्ट, कृति सेनन,रणवीर सिंह, प्रियंका चोप्रा सारखे अनेक सेलिब्रेटी देखील आहेत.

वाढदिवसाच्या आधीच अकाऊंट हँक

अभिनेता जॉन अब्राहमचा येत्या १७ डिसेंबर रोजी ४९वा वाढदिवस आहे. वाढदिवसाला २ दिवस बाकी असताना त्याचे इन्स्टाग्राम अकाऊंट हँक झाले आहे. जॉन अब्राहमचा अटॅक हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी हे केले असावे असे म्हटले जात आहे. कारण अद्याप जॉनचे इन्स्टाग्राम अकाऊंट हँक झाल्याची माहिती त्याने दिलेली नाही.

- Advertisement -

 


हेही वाचा –  बॉडीकॉन ड्रेसमध्ये Priyanka Chopra चा हटके ‘लेडी बॉस’ लूक

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -