Gangubai Kathiawadi सिनेमाविरोधात कामाठीपुरातील रहिवाशांची हायकोर्टात याचिका, बुधवारी तातडीची सुनावणी

Gangubai Kathiawadi सिनेमाविरोधात कामाठीपुरातील रहिवाशांची हायकोर्टात याचिका, बुधवारी तातडीची सुनावणी

Gangubai Kathiawadi सिनेमाविरोधात कामाठीपुरातील रहिवाशांची हायकोर्टात याचिका, बुधवारी तातडीची सुनावणी

Gangubai Kathiawadi : गंगूबाई काठियावाडी सिनेमा विरोधातील वाद चांगलाच पेटला आहे. फ्रि प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, सिनेमात दाखवण्यात आलेल्या दृश्यांवरुन मुंबईतील कामाठीपुरातील रहिवाशी चांगलेच आक्रमक झाले असून त्यांना गंगूबाई काठियावाडी सिनेमाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. सिनेमात दाखवण्यात आलेल्या दृश्यांवरुन संपूर्ण कामाठीपुराची बदनामी होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. कामाठीपुरा रहिवाशांनी केलेल्या याचिकेवर बुधवारी तातडीची सुनावणी घेण्याचे हायकोर्टाकडून निश्चित करण्यात आले आहे.

सिनेमात दाखवण्यात आलेल्या कामाठीपुराच्या दृश्यांमुळे संपूर्ण कामाठीपुराची बदनमी होत असल्याने सिनेमातून कामाठीपुरा हे नाव काढून टाकण्यात यावे अशी मागणी याचितकेतून करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कामाठीपुराचा संपूर्ण एरिया रेड लाइट एरिया म्हणून दाखवण्यात आला आहे आणि तिथे राहणाऱ्या सर्व महिलांना वेश्या म्हणवून सिनेमातून त्यांना बदनाम करण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

संजय लीला भन्साळी आणि आलिया भट्ट यांचा गंगूबाई काठियावाडी या बहुप्रतिक्षित सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. २५ फेब्रुवारीला सिनेमा रिलीज होणार आहे मात्र त्याआधीच सिनेमावर टांगती तलवार दिसत आहे. सिनेमा विरोधात याचिकांचे सत्र अद्याप सुरू आहे.

Gangubai Kathiawadi : गंगूबाई काठियावाडी, कामाठीपुरा ते माफिया क्विन आणि करीम लाला

या आधी देखील गंगुबाई काठियावाडी सिनेमात गंगुबाईंची खरी प्रतिमा मलिन केल्याचा आरोप गंगुबाईंच्या कुटुंबियांनी केला होता. सिनेमाच्या निर्मात्यांनी आमची कोणतीही परवानी न घेता त्याचप्रमाणे आमच्याकडून कोणतीही खरी माहिती न घेता केवळ पैसे कमावण्यासाठी गंगुबाईंची खोटी माहिती दाखवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

गंगूबाई काठियावाडी यांची खरी कहाणी

त्याचप्रमाणे याआधीही सिनेमामुळे संपूर्ण कामाठीपुरा बदनाम होईल  त्यामुळे सिनेमाचे नाव बदलण्यात यावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी हायकोर्टात दाखल केली आहे. येत्या शुक्रवारी सिनेमा रिलीज होणार आहे. सिनेमाचा सध्या सुरू असलेला वादाचा बॉक्स ऑफिसवर परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.


हेही वाचा  – ‘Gangubai Kathiawadi’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; गंगूबाईंची बदनामी केल्याचा कुटुंबीयांचाच आरोप

First Published on: February 22, 2022 12:24 PM
Exit mobile version