…म्हणून कंगनाचा ‘हा’ हॉट आणि बोल्ड फोटो होतोय व्हायरल

...म्हणून कंगनाचा 'हा' हॉट आणि बोल्ड फोटो होतोय व्हायरल

सध्या लॉकडाऊन असल्यामुळे बॉलिवूडचे सेलिब्रिटी सोशल मीडियावर जास्तच सक्रिय आहेत. सेलिब्रिटी आपल्या कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळे घालवताना दिसत आहेत. दरम्यान बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रणौतचा एक जुना फोटो फारच चर्चेत आला आहे. काही वेळापूर्वी प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्ननीने कंगनाचा हा फोटो शेअर केला आहे. सध्या कंगनाचा हॉट आणि बोल्ड अंदाजात असलेला हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

कंगनाचा हा फोटो डब्बू रत्नानी याच्या एका कॅलेंडरमधील आहे. कंगाच्या या हॉट आणि बोल्ड फोटो चाहत्यांच्या लाईक्स वर्षाव होत आहे. हा फोटोला अवघ्या एका तासात २३ हजार लोकांनी लाईक केले आहे. कंगनाच्या या फोटोला फक्त चाहत्यांनीच नाहीतर तर सेलिब्रिटींनी देखील कमेंट केली आहे.

बॉलिवूडमध्ये २५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने डब्बू रत्नानीने कंगनासह इतर कलाकारांचे फोटो इन्स्टाग्राम शेअर केले आहेत. #25yearsofdabbooratnani असे हॅशटॅग देऊन त्यांनी बॉलिवूडच्या अनेक कलाकारांचे फोटो शेअर केले आहेत. त्याने काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन, कतरिना कॅफ, शाहिद कपूर, हृतिक रोशन, सलमान खान अशा अनेक बॉलिवूड कलाकराचे फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे त्याने नुकताच शेअर केलेला कंगनाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


हेही वाचा – महिलेची छेडछाड केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाला अटक!


 

First Published on: May 20, 2020 5:54 PM
Exit mobile version