घरताज्या घडामोडीमहिलेची छेडछाड केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाला अटक!

महिलेची छेडछाड केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाला अटक!

Subscribe

राजस्थानच्या अलवार जिल्ह्यात पोलीस उपनिरीक्षकाने एका महिलेची छेडछाड केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी राजस्थान पोलीस उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही २३ वर्षीय महिला एका कंपनीत काम करत होती. ती निमराना पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी गेली होती.

पण पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवल्यानंतर स्टेशन पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र सिंह यांनी घरी सोडण्याच्या बहाण्याने तिला गाडीत बसवले. मग त्याने तिला जपानी औद्योगिक क्षेत्रात घेऊ गेला आणि तिथे तिची छेडछाड केली. भिवाडी पोलीस अधीक्षक अमनदीप सिंह कपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने १७ मे रोजी पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र सिंह विरुद्ध छेडछाडमुळे गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र सिंह अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

निमराना पोलिस स्टेशनमधील पोलीस स्टेशन प्रभारी संजय शर्मा म्हणाले, लॉकडाऊनमध्ये रेशन मिळविण्यासाठी या महिलेने मदत मागितली होती. याची व्यवस्था झाली होती. पण तिच्याकडे पैसे नसतानाही घरमालक भाडे मागत असल्यामुळे ती तक्रार करण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये आली होती.


हेही वाचा – Lockdown: ४० देशांनी उठवला लाॅकडाऊन; सहा देश सीमा उघडण्यास तयार!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -