Hijab Row : हिजाब वादावर कंगनाची प्रतिक्रिया, म्हणाली हिंमत असेल तर अफगाणिस्तानमध्ये…

Hijab Row :  हिजाब वादावर कंगनाची प्रतिक्रिया, म्हणाली हिंमत असेल तर अफगाणिस्तानमध्ये…

Kangna Ranaut On Hijab Row : कर्नाटकच्या उडुपी येथे कॉलेजमध्ये हिजाब घालण्यावरुन सुरू झालेला वाद चांगलाच रंगला आहे. हा वाद आता हळूहळू राजकीय रंग घेत असून देशातील अनेक राजकीय मंडळी या प्रकरणावर आपल्या प्रतिक्रिया देत आहे. अनेक जण हिजाबच्या विरोधात आहेत तर अनेकांनी हिजाबला पाठिंबा दिला आहे.  ऋचा चंडा, अली गोनी यासारख्या अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी देखील यावर भाष्य करुन  निषेध व्यक्त केला आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेली पंगा गर्ल अभिनेत्री कंगना रणौतने देखील यावर प्रतिक्रिया देत खुलेपणाने भाष्य केले आहे.

कंगना रणौतने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लेखक आनंद रंगनाथन यांच्या पोस्टचा स्क्रिनशॉर्ट शेअर केला आहे. या फोटोमध्ये इराणच्या बदललेल्या परिस्थितीची झलक दाखवणारे दोन फोटो शेअर केले आहे. त्यातील पहिला फोटो हा १९९७ सालचा आहे. ज्यात इराणी महिला बिकीनी घालून आहेत आणि आताच्या महिला बुरखा परिधान केलेल्या आहेत. १९७३चा इराण आणि आताचा इराण असे म्हणत आनंद रंगनाथन यांनी हा फोटो शेअर केला आहे.

आनंद रंगनाथन यांनी शेअर केलेल्या फोटोवर कंगनाने म्हटले आहे की, ‘जर हिंमत दाखवायची असेल तर अफगाणिस्तानमध्ये बुरखा न घालता राहून दाखवा. आधी स्वत:ला पिंजऱ्यातून मुक्त करायला शिका’.

कंगनाच्या आधी प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनीही हिजाबवर आपली प्रतिक्रिया देत ट्विट केले. ज्यात त्यांनी म्हटले आहे की, मी कधीच हिजाबच्या बाजूने नव्हतो. मुलींच्या छोट्या ग्रुपला धमकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुंडांचा मी निषेध करतो. हिच त्यांची मर्दानगी आहे का ? असा प्रश्न जावेद अख्तर यांनी केला आहे.


हेही वाचा –  Hijab Controversy: विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक विषारी भिंत उभी राहतेय – कमल हासन

First Published on: February 10, 2022 8:36 PM
Exit mobile version