घरताज्या घडामोडीHijab Controversy: विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक विषारी भिंत उभी राहतेय - कमल हासन

Hijab Controversy: विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक विषारी भिंत उभी राहतेय – कमल हासन

Subscribe

कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाब वादाचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहे. या वादावर अभिनेते आणि मक्काल निधी मय्यमचे अध्यक्ष कमल हसन यांनी ट्विट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे.

कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाब वादाचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहे. या वादावर अभिनेते आणि मक्काल निधी मय्यमचे अध्यक्ष कमल हसन यांनी ट्विट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. आता सावध राहण्याची वेळ आली असून हिजाबच्या मुद्द्यावरुन विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक विषाची भिंत उभी केली जातेय, असे कमल हासन यांनी म्हटले आहे.

कमल हासन यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कर्नाटकात जे सुरू आहे त्याने अशांतता निर्माण होत आहे. खोट न बोलणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये धर्मिक विषारी भिंत उभी केली जात आहे. त्यामुळे कर्नाटकाच्या शेजारील राज्यांनी आता सावध राहणे गरजेचे आहे. कर्नाटकातील वाद तमिळनाडूत येता कामा नये.

- Advertisement -

हिजाब किंवा बिकिनी तो महिलांचा अधिकार – प्रियंका गांधी  

एका शाळेपासून सुरू झालेला हिजाबच्या वादाने आता राजकीय रंग घेतला आहे. बिकिनी असो, घूंगट असो, जीन्स किंवा हिजाब. महिलांनी काय घालायचे हा महिलांचा अधिकार आहे. हा अधिकार संविधानाने त्यांना दिला आहे. महिलांचा अशा प्रकारे छळ बंद करा. लडकी हू लड सकती हू असे आवाहन काँग्रेसच्या महसचिव प्रियंका गांधी यांनी केले आहे.

- Advertisement -

अभिनेत्री रिचा चड्डा हिनी देखील यावर प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, तुमच्या मुलांना चांगल्या पद्धतीने वाढवा. एका भ्याड जमावाने एका महिलेवर हल्ला केला ही गोष्ट त्यांना अभिमानाची वाटते. हे फार लज्जास्पद असल्याचे तिने म्हटले आहे.

पाहा संपूर्ण ट्विट 

तर अभिनेता अली गोनीने म्हटले आहे की, हिजाब विरोधात पुढे आलेल्या त्या महिलेला अली गोनीने शेरनी असे म्हटले आहे. एका महिलेच्या झुंडेत तिला हे कुत्रे घाबवरू शकत नाही, असे त्याने म्हटले आहे.

हिजाब वाद प्रकरणी आज दुसऱ्या दिवशी कर्नाटक हाय कोर्टात यात सुनावणी पार पडली. शाळा आणि कॉलेजमध्ये मुस्लिम धर्मीय मुली हिजाब न घालण्याच्या आदेश देऊ शकतात की नाही याबाबत निकाल देण्याचा निर्णय कर्नाटक हायकोर्टाने मोठ्या खंडपीठाकडे पाठवला आहे.


हेही वाचा  –  Karnataka Hijab Row: कर्नाटक उच्च न्यायालयाने हिजाब वाद प्रकरण पाठवले मोठ्या खंडपीठाकडे

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -