Kangna Ranaut: सैफ अली खान घेतोय तैमूरची शाळा, आता कंगना म्हणते…

Kangna Ranaut: सैफ अली खान घेतोय तैमूरची शाळा, आता कंगना म्हणते…

Kangna Ranaut: सैफ अली खान घेतोय तैमूरची शाळा, आता कंगना म्हणते...

करिना कपूर (Kareena Kapoor) काही दिवसांपूर्वीच कोरोनामुक्त झाली. करिना सध्या तिच्या फॅमिलीसोबत क्वालिटी टाइन स्पेंड करत असून ती दररोज मुलांचे आणि स्वत:चे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. बबोचे फोटो सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर तैमूर (Taimur ) आणि सैफ अली खानचा (Saif Ali khan)  फोटो शेअर केला आहे. ज्यात सैफ अली खान बेडवर बसून नाश्ता करतोय तर छोटा तैमूर सैफच्या पुढ्यात झोपून अभ्यास करत आहे. हा फोटो नेटकऱ्यांच्या तर प्रचंड पसंतीस उतरला मात्र पंगा गर्ल कंगना रणौतने (Kangna Ranaut)  देखील या फोटोवर तिची बहुमूल्य प्रतिक्रिया दिली आहे. (kangna ranaut reaction on kareena kapoor photos ) कंगनाने तैमूरच्या फोटोला दिलेल्या प्रतिक्रिया पाहून नेटकऱ्यांच्या देखील भुवया उंचावल्या आहेत.

खरंतर करिनाचे आणि कंगनाचे चांगले रिलेशन आहे. तैमूर आणि जेहवर कंगनाचे विशेष प्रेम आहे. करिनाने शेअर केलेल्या फोटोवर कंगनाने ‘ब्यूटिफूल’ असे म्हणत प्रेम व्यक्त केले. सोबत कंगनाने तैमूर आणि सैफसाठी हार्ट इमोजी देखील शेअर केला आहे. कंगनाने दिलेली प्रतिक्रिया पाहून सगळेच अवाक झालेत. सतत पंगा घेणारी कंगनाने इतकी मृदू कशी झाली असा प्रश्न सर्वांना पडला.

 

माझी सकाळ.. सैफने विचारले, बेबो तु इंन्स्टाग्रामसाठी नवीन फोटो क्लिक करतेयस का? मी, हा क्लिक!!! सैफ आणि टिम टिम माय बॉइज, असे म्हणत करिनाने सैफ आणि तैमूरचा फोटो शेअर केला आहे. खरंतर सैफ सकाळी नाश्ता करत असताना तैमूर त्यांच्यासोबत अभ्यासाला बसला होता. करिनाला तो क्षण कॅमेरात कॅप्चर करायचा होता म्हणून करिनाने सैफच्या नकळतच दोघांचा फोटो क्लिक केला.

करिना तिच्या पोस्टमुळे आणि आता कोरोनाची लागण झाल्याने चांगलीच चर्चेत आली होती. करिना नव्या वर्षात लाल सिंह चड्डा या सिनेमात दिसणार आहे. करिना २०२०मध्ये इरफान खानच्या अग्रेजी मिडीअम या सिनेमा दिसली होती. त्यानंतर दीड वर्षांनंतर करिना पुन्हा एकदा सिनेमाच्या मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.


हेही वाचा –  Kareena kapoor: कोविडचे नियम सांभाळत करिना सैफची कॉफी डेट, पहा फोटो

First Published on: January 1, 2022 1:31 PM
Exit mobile version