Kapil Sharma Foreign Concerts: बऱ्याच काळानंतर कपिल शर्मा निघाला परदेशी दौऱ्याला

Kapil Sharma Foreign Concerts: बऱ्याच काळानंतर कपिल शर्मा निघाला परदेशी दौऱ्याला

Kapil Sharma Foreign Concerts: बऱ्याच काळानंतर कपिल शर्मा निघाला परदेशी दौऱ्याला

सोनी टेलिव्हिजन वाहिनीवरील ‘द कपिल शर्मा’ शोमधील अभिनेता आणि कॉमेडियन कपिल शर्मा त्याच्या कॉमेडी अंदाजाने प्रक्षेकांना खूप हसवत असतो. या शोला खूप पसंती मिळत आहे. या शोला भारतच नाही तर जगभरातून पसंती मिळते. म्हणून हा लोकप्रिय शोपैकी एक शो आहे. या शोच्या माध्यमातून अनेक चित्रपटाचे प्रमोशन केले जाते. या शोमध्ये अक्षय कुमार, सलमान खान असे अनेक दिग्गज कलाकार येत असतात. दरम्यान आता कपिल शर्मा बऱ्याच काळानंतर परदेशी दौऱ्याला जाणार आहे. जेव्हा कपिल शर्मा ऑस्ट्रिलियाला गेला होता त्याचा मित्र सुनील ग्रोवरसोबती मैत्री तुटली होती. यावेळी कपिल शर्माला खूप अडचणींना सामोरे जावे लागले होते. तरीही यापरिस्थितही त्याने प्रेक्षकांना हसवणे थांबवले नाही.

कपिल शर्माने त्याच्या इंटाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमधून समजते की कपिल पुन्हा परदेशी दौऱ्यावर जाणार आहे. त्याने या फोटोला कॅप्शन लिहिले आहे की, ‘2022 वर्षामध्ये मी अमेरिका-कॅनडा दौऱ्याला जाणार असून मला खूप आनंद होत आहे. हे वर्ष खूप महत्त्वाचे आहे आणि आपण लवकरच भेटणार आहोत.’ कपिलच्या या पोस्टनंतर प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. कपिल शर्माने शेअर केल्या फोटोमध्ये त्याच्या कार्यक्रमाची तारीख आणि त्याबद्दलची माहिती दिली आहे.


हेही वाचा – Javed akhtar प्रकरणात कोर्टाने kangana ranaut ची याचिका फेटाळली


 

First Published on: March 23, 2022 4:10 PM
Exit mobile version