Video: …यामुळे झाली ‘सूर्यवंशी’च्या सेटवर अक्षय आणि रोहितमध्ये हाणामारी!

Video: …यामुळे झाली ‘सूर्यवंशी’च्या सेटवर अक्षय आणि रोहितमध्ये हाणामारी!

लवकरच बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार ‘सूर्यवंशी‘ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी करत आहे. मात्र या चित्रपटाच्या दरम्यान एक धक्कादायक घडना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फारच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये खिलाडी अक्षय कुमार आणि दिग्दर्शक रोहित शेट्टीमध्ये हाणामारी झाल्याचे दिसत आहे. यामुळे पोलिसांना ‘सूर्यवंशी’च्या सेटवर यावे लागले. तसंच या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे निर्माता करण जोहरने याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

या सर्व घडलेल्या घटनेचा व्हिडिओ करण जोहरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना करणने असं लिहिलं की, ‘हे असं काही घडलं आहे ज्यामध्ये मी हस्तक्षेप करू शकतं नाही.’ करण जोहरच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी खूप मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. वास्तविक या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार आणि रोहित शेट्टी हे दोघं गंमतीदार पद्धतीने एकमेकांना मारत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातील अभिनेत्री कतरिना कैफने ब्रेकिंग न्यूज देताना दिसत आहे.

अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ हा अॅक्शन चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर आणि रोहित शेट्टी यांनी केली आहे. ‘धर्मा प्रोडक्शन’ आणि ‘रोहित शेट्टी पिक्चर्स’च्या निर्मितीखाली हा चित्रपट तयार होत असून पुढच्या वर्षी २७ मार्चला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये रणवीर सिंग, अजय देवगण यांच्यासह अक्षय कुमार आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत. काही दिवसांपूर्वी ‘सूर्यवंशी’च्या सेटवरील अक्षय कुमार आणि कतरिना कैफचा रोमँटिक व्हायरल झाला होता.


हेही वाचा – दीप-रणवीर लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करणार नाही?


 

First Published on: November 12, 2019 9:19 PM
Exit mobile version