घरमनोरंजन'सूर्यवंशी' तमिळ सिनेमाचा रिमेक नाही - रोहित शेट्टी

‘सूर्यवंशी’ तमिळ सिनेमाचा रिमेक नाही – रोहित शेट्टी

Subscribe

रोहित शेट्टीने सूर्यवंशी या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. त्यानंतर रोहीत शेट्टीने ‘सूर्यवंशी’ या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. परंतु हा सिनेमा तमिळ भाषेतील ‘सूर्यवंशी’ चित्रपटाचा रिमेक असल्याची चर्चा केली जात आहे. मात्र रोहीत शेट्टीने हा कुठल्याही चित्रपटाचा रिमेक नसल्याचे म्हटले आहे. ही एक ओरिजनल स्टोरी असून दिर्घकाळापासून यावर काम सुरु असल्याचेही त्याने स्पष्ट केले.

डिसेंबर महिन्यात येणार प्रेक्षकांच्या भेटीला 

सूर्यवंशी या नावाचे दोन चित्रपट या आधी प्रदर्शित झाले आहेत. एका चित्रपटाती अभिनेता सलमान खान याने काम केले आहे. तर महानायक अमिताभ बच्चन यांनी सुर्यवंशम या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. त्यामुळे रोहित शेट्टीला सूर्यवंशी हे टायटल मिळवण्यासाठी अनेकांना मिनत्तवाऱ्या करव्या लागल्या आहेत. अखेर निर्माता बोनी कपूर यांच्या मदतीने टायटल मिळवण्सायाचा मार्ग मोकळा झाला आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत खिलाडीकुमार अक्षय कुमार दिसणार असून त्याच्यासोबत सोनम कपूर दिसणार असल्याचे समजते. हा सिनेमा १९ डिसेंबर रोजी प्रदर्शीत होणार आहे.

- Advertisement -

‘गोलमाल ५’ ची चर्चा सुरु 

रोहित शेट्टीचे सगळेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतात. त्याच्या चित्रपटांचे सिक्वल येणे ही चाहत्यांनसाठी परवणी ठरते. ‘गोलमाल ५’ चित्रपटाची घोषणादेखील करण्यात आली आहे. या सिक्वलमध्ये पूर्वीचीच स्टारकास्ट असणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतू अभिनेत्री कोण असणार हे अद्याप गुलस्त्यात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -