घरमनोरंजनअक्षय कुमार आणि बॉबी देओलचा रितेशला चुम्मा

अक्षय कुमार आणि बॉबी देओलचा रितेशला चुम्मा

Subscribe

‘हाऊसफूल ४’ या आगामी चित्रपटाच्या ‘एक चुम्मा’ या गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या गाण्याच्या टीझरवरुन हा चित्रपट प्रचंड विनोदी असणार आहे, असे चित्र दिसत आहे. या चित्रपटाच्या पहिल्या गाण्याचे टीझर रविवारी संध्याकाळी सोशल मीडियावर प्रदर्शित झाले. अभिनेता अक्षय कुमारने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरव हा व्हिडिओ शेअर केला आहे. या गाण्याच्या टीझरमध्ये अभिनेता बॉबी देओल आणि अक्षय कुमार यांनी रितेश देशमुखला गाण्याच्या बोलनुसार चुम्मा दिल्याचे दिसत आहे. या गाण्यात अक्षय कुमार, बॉबी देओल, रितेश देशमुख यांच्यासह क्रिती खरबंदा, क्रिती सनून आणि पूजा हेगडे दिसत आहेत. हे संपूर्ण गाण सोमवारी प्रदर्शित होणार आहे.

- Advertisement -

हा चित्रपट पूनर्जन्मशी संबंधित आहे. एक चुम्मा गाण्याचे टीझर प्रदर्शित झाल्यापासून सोशल माडियावर चांगलेच चर्चेत आले आहे. या गाणे ट्विटरवर ट्रेंडिंगला आले आहे. दरम्यान, हे संपूर्ण गाण रविवारी किती वाजता प्रदर्शित होणार याची अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र, सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी १२ ते १ वाजेच्या सुमारास हे संपूर्ण गाणे प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

याअगोदर २७ सप्टेंबरला या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात चार गाणे असणार आहे. त्यात अक्षय कुमार एक रॅप साँग बोलताना दिसणार आहे. चित्रपटाचा ट्रेलरही अतिशय भन्नाट आहे. ट्रेलर बघितल्यावर हा चित्रपट विनोदाच्या बाबतीत याअगोदरच्या तीन हाऊसफूल चित्रपटाचे रेकॉर्ड मोडणार असे दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -