ड्रग्स अन् दारू घेणाऱ्यांना बघण्याची इच्छा नाही; करिना व करिष्मा कपूर नेटकऱ्यांकडून ट्रोल

ड्रग्स अन् दारू घेणाऱ्यांना बघण्याची इच्छा नाही; करिना व करिष्मा कपूर नेटकऱ्यांकडून ट्रोल

बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री करिष्मा कपूर(karishma kapoor) आणि करीना कपूर(kareena kapoor) या दोन बहिणी तर आहेतच पण त्या दोघींमध्ये मैत्रीचं नातं सुद्धा आहे. या दोघीही एकमेकींच्या खूप जवळ आहेत. करिष्मा आणि करीना या दोघींना लोलो आणि बेबो म्हणूनही ओळखले जाते. या दोघीही काही न काही कारणामुळे सतत चर्चेत सुद्धा असतात. या दोघी बहिणी सतत एकत्र फिरताना सुद्धा दिसतात. नुकतच या दोघीनींही एकल पार्टीत हजेरी लावली होती. त्या पार्टीतील काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.

सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा(manish malhotra) याच्या घरी एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं या पार्टीला बॉलिवूड मधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होतो. करीना कपूर, करिष्मा कपूर, करण जोहर(karan johar) आणि नताशा पुनावाला हे कलाकार पार्टीत सहभागी झाले होते. याचाच एक विडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांकडूनही या व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत.

हे ही वाचा – कृष्णा अभिषेकने ‘द कपिल शर्मा शो’ सोडण्यामागचं कारण आलं समोर

या पार्टीमध्ये करिनाने(kareena kapoor) व्हाईट टी – शर्ट आणि ब्लॅक जीन्स परिधान केली होती तर करिष्माने (karishma kapoor) ब्लॅक वन पीस परीधान केला होता. दोघीही खूप सिम्पल लुक मध्ये दिसत होत्या. दरम्यान सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यात दोघीही मनीषच्या मल्होत्राच्या घरातून बाहेर पडताना दिसत आहे. त्यावेळी यया दोन सेलिब्रिटी बहिणींचे फोटो काढण्यासाठी अनेक कॅमेरा पुढे आले आणि त्यांनी या दोघींचेही फोटो टिपले. याच फोटो आणि व्हिडीओनंतर करीना आणि करिष्मा या दोन वहिनींना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत.अनेकांनी त्या दोघीही दारु प्यायल्या आहेत असे सांगत कमेंट केली आहे. यात एका नेटकऱ्याने ‘किती दारु प्यायला’ असा प्रश्न सुद्धा त्यांना विचारला आहे. तर एकाने ‘लाल सिंग चड्ढाची फ्लॉप पार्टी’ असं म्हणत डिवचल्याहचे सुद्धा दिसते. ‘कसे लपून लपून येतात ही लोकं’, असे एक नेटकरी म्हणाला आहे. ‘ड्रग्ज आणि दारु घेणारे हे लोक बघण्याची इच्छा नाही’, अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

हे ही वाचा – गायक दिव्या कुमारचं मराठी म्युझिक अल्बममध्ये पदार्पण!!

दरम्यान अभिनेत्री करिष्मा कपूर मेंटल हुड या वेब सिरीज मध्ये झळकळली होती. त्यानंतर करिष्मा कपूर ब्राऊन या चित्रपटात सुद्धा झळकणार आहे. तर अभिनेत्री करीना कपूर हीच लाल सिंग चड्ढा(lal singh chadhha0 हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. पण या चित्रपटाला प्रेक्षकांनी मात्र पाठ फिरवली. त्यांनंतर आता पार्टीमधल्या या व्हिडीओ मुळे या दोन बहिणी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

हे ही वाचा – पंकजा मुंडे निवेदिकेच्या भूमिकेत; उंच माझा झोका पुरस्कार सोहळ्याचे करणार निवेदन

First Published on: August 24, 2022 10:25 AM
Exit mobile version