खिलाडी अक्षय कुमार पुन्हा धावला मदतीला , कोरोनाच्या लढाईसाठी देणार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स

खिलाडी अक्षय कुमार पुन्हा धावला मदतीला , कोरोनाच्या लढाईसाठी देणार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स

खिलाडी अक्षय कुमार पुन्हा धावला मदतीला , कोरोनाच्या लढाईसाठी देणार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स

जगभरामध्ये कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. अनेक देशांमध्ये परत एकदा लॉक डाऊन लावण्याची वेळ आली आहे. भारतामध्येही अनेक राज्यात कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला जरी सुरवात झाली असली तरी कोरोना व्हायरसची दुसरी लाट झपाटयाने पसरत आहे. आपुर्‍या सोयी सुविधा अभावी अनेक रुग्ण दगावत आहेत. देशामधील बिकट परिस्थिति पाहता अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आता मदतीसाठी धावून येत आहेत. अभिनेता अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना हे दोघेही कोरोना रूग्णांच्या सेवेसाठी पुन्हा सज्ज झाले आहेत. अक्षयने लोकांपर्यंत ऑक्सिजन पोहचवून त्यांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. अक्षय आणि ट्विंकल दोघेही  मिळून 100 ऑक्सीजन कंसंट्रेटर दान करणार आहेत.

 

ट्विंकलने ट्विट करत नागरिकांना ”विश्वासदायक अधिकृत एनजीओचा शोध घेत आहोत. कृपया माला अश्या खात्रीदायक एनजीओ बद्दल माहिती द्या,जेणेकरून  100 ऑक्सीजन कंसंट्रेटर वाटण्यासाठी मदत करू शकेल. तसेच हे ऑक्सीजन कंसंट्रेटर युके मधून त्यांच्या कडे पोहोचतील अशी सोय करण्यत आली आहे. तसेच लंडन मधील मारतीय वाशांचे डॉक्टर देखील आमच्या सोबत या उपक्रमात जोडले गेले आहेत . त्यांनी 120 ऑक्सीजन कंसंट्रेटर दान करण्याचं ठरवलं आहे. आता मदतीसाठी एकूण 220 ऑक्सीजन कंसंट्रेटर आपल्याकडे उपलब्ध आहेत”असे ट्विट मध्ये लिहलं आहे.
नुकतच काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार याने गौतम गंभीर याच्या संस्थेला 1 कोटी रुपये दान केले होते. अक्षयच्या या दिलदारपणाचं कौतुक सर्व सतरावरून करण्यात येत आहे.


हे हि वाचा – सुगंधा मिश्राने शेअर केले लग्नातील खास क्षणाचे फोटो,चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव

First Published on: April 28, 2021 12:09 PM
Exit mobile version