शाहरुख खान हिंदू की मुस्लीम? नेटिझन्सने केले ट्रोल!

शाहरुख खान हिंदू की मुस्लीम? नेटिझन्सने केले ट्रोल!

शहारूख खान

बॉलिवूडमधील स्टार किड्सबद्दल प्रेक्षकांमध्ये कुतुहल असते. त्यामुळे हे कलाकार सोशल मीडियावरून आपल्या मुलांचे अपडेट चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतात. पण अनेक वेळा एखाद्या फोटोमुळे नेटिझन्सचा रोष ओढवून घेतात. यामध्ये किंग खान शाहरुख खानही मागे नाहीये. शाहरूखचा गोड मुलगा अबरामबद्दल चाहत्यांमध्ये कायमच उत्सुकता असते. त्यामुळे शाहरुख कायमच अबरामचे फोटो चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. मात्र यावेळी अबरामच्या एका फोटोमुळे शाहरुखवर सध्या प्रश्नांचा भडिमार होतोय. ‘शाहरुख मुस्लिम आहे की हिंदू?’ असे प्रश्न सध्या त्याचे चाहते त्याला विचारत आहेत.


तुम्ही हे वाचलंत का? – दहीहंडी फोडल्याने शाहरुख सापडला नव्या वादात!


काय आहे फोटोमध्ये?

शाहरुखने अबरामचा गणेशोत्सवानिमित्त एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये छोटा अबराम गणपती बाप्पासमोर हात जोडून प्रार्थना करत असल्याचं दिसत आहे. मात्र अबरामच्या या फोटोवर शाहरुखला मात्र नेटकऱ्यांच्या प्रश्नांना सामोरं जावं लागतंय. या फोटोवरून शाहरुख, ‘तू हिंदू आहे की मुस्लीम?’ असा प्रश्न त्याला विचारला जातोय. ‘माझा लहानगा अबराम गणपतीला एका खास नावाने संबोधतो, त्याच्या भाषेत सांगायचं तर ‘आमच्या घरी गणपती पप्पा आले आहेत, असं तो म्हणतो’, असं कॅप्शन शाहरुखने या फोटोला दिलं आहे. ‘तू मुसलमान असून गणपतीची पूजा का करतोस? मुस्लिमांमध्ये मूर्तीपूजा करत नाहीत, हे तुला माहीत नाही का? तू हिंदू आहेस की मुस्लीम?’ असे अनेक प्रश्न त्याला विचारले जातायत.

शाहरुख हा जरी मुस्लीम असला तरी त्याची बायको गौरी हिंदू आहे. त्यामुळे त्याच्या घरी दोन्ही धर्मांचे सण साजरे केले जातात. शाहरुख खान जितक्या उत्साहाने ईद साजरी करतो, तितक्याच उत्साहाने गणपती उत्सव ही साजरा करतो.

First Published on: September 20, 2018 6:41 PM
Exit mobile version