घरमुंबईदहीहंडी फोडल्याने शाहरुख सापडला नव्या वादात 

दहीहंडी फोडल्याने शाहरुख सापडला नव्या वादात 

Subscribe

दहीहंडी उत्सव घरी साजरा केल्यामुळे शाहरुख खान अडचणीत आला आहे. इस्लाम देवबंद या संघटनेने शाहरुखने दहीहंडी फोडल्यामुळे आक्षेप घेत त्यावर टीका केली आहे.

बॉलिवूडचा किंग खान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडला आहे. जन्माष्टमीच्या दिवशी शाहरुख खानने दहीहंडी फोडली. त्यामुळे त्याच्यावर ‘इस्लाम देवबंद’ ही कट्टर मुस्लिम संघटनेने नाराज होऊन त्याच्यावर टीका केली आहे. इस्लाममध्ये दुसऱ्या धर्माचे सण साजरे करण्यास मनाई असल्याचे या संघटनेने सांगितले आहे.

दहीहंडी साजरी केल्याने संघटना नाराज

कृष्णजन्माष्टमीला शाहरुख खानने त्याच्या वांद्रे येखील ‘मन्नत’ निवासस्थानी दहीहंडी फोडली होती. शाखरुखचा दहीहंडी फोडतानाचा फोटो सोशल मीडियावर टाकून सर्वांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. शाहरुखसोबत त्याची पत्नी गौरी, मुलगा अब्राहम देखील दहीहंडी फोडताना उपस्थित होते. शाहरुखने दहीहंडी फोडून उत्साह साजरा केल्यामुळे इस्लाम देवबंदी ही संघटना आक्रमक झाली आहे. शाहरुखने दहीहंडी फोडने त्यांना आवडले नसून त्यांनी शाखरूखवर टीका केली आहे.

- Advertisement -

इतर धर्माचे सण साजरे करणे योग्य नाही

‘फतवा ऑन मोबाईल सर्विस’चे अध्यक्ष मुफ्ती अर्शद फारूकी यांनी सांगितले की, चित्रपट कलाकारांना कोणताही धर्म नसतो. मात्र शाहरुख खान एक सेलिब्रिटी आहेत. त्यामुळे त्याने कोणत्या धर्माच्या सणाला कशा पध्दतीने साजरा केला पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. एखाद्या सणामध्ये सहभागी होणे वेगळे आहे. पण कोणत्याही अन्य धर्माचे सण घरी साजरे करणे हे इस्लाम धर्मानुसार योग्य नाही. इस्लामाने त्याचा विरोध केला आहे.

संबंधित बातमी वाचा – 

शाहरुख खान आणि त्याच्या बालगोपाळाची दहीहंडी
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -