घरमनोरंजनकिंग खान शाहरुखची 'धूम-४' मध्ये एंट्री होणार?

किंग खान शाहरुखची ‘धूम-४’ मध्ये एंट्री होणार?

Subscribe

जबरदस्त अॅक्शन आणि स्टंट्सनी भरलेला बॉलीवूड चित्रपट म्हणजे ‘धूम’. धूम चित्रपटाचे तिन्ही भाग तूफान लोकप्रिय झाले होते. धूम 1, धूम 2 आणि धूम 3 या तिन्ही चित्रपटांच्या यशानंतर, आता चाहत्यांना धूम 4 चे वेध लागले आहेत. ‘धूम 4’ या आगामी चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा आहे. ‘धूम’ चित्रपट आणि त्यातील ‘व्हिलन’ हे समीकरण हिट ठरलं आहे. त्यामुळे धूमच्या चौथ्या पार्टमधला खलनायक कोण साकारणार? याची सर्वांनाच उत्सुकता होती.  ‘धूम 4’ मध्ये सलमान खान मुख्य निगेटीव्ह भूमिकेत झळकणार असल्याचं जवळजवळ नक्की झालं होतं. मात्र, आता याविषयी काही वेगळंच ऐकायला येत आहे. ‘धूम 4’मध्ये आता सलमानऐवजी अभिनेता शाहरुख खान काम करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. उपलब्ध माहितीनुसार रोमान्स किंग शाहरुख खान धूम 4 चित्रपटामध्ये खलनायकाची भूमिका साकारणार आहे. या बातमी विषयी अद्याप अधिकृत सूत्रांकडून काही समजलं नसलं तरी, बी-टाऊनमध्ये शाहरुख सलमानला रिप्लेस करणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत.

srk-salman
प्रातिनिधिक फोटो

दरम्यान सध्या शाहरुख खान त्याच्या ‘झिरो’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात बिझी आहे. तर अभिनेता सलमान खान त्याच्या आगामी ‘भारत’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. शाहरुखच्या झिरो चित्रपटातील एका गाण्यात सलमान खान झळकला आहे. सोशल मीडियावर या गाण्याला चांगलीच लोकप्रियताही मिळाली आहे. मात्र, धूम 4च्या मुद्द्यावरुन आता या दोन खान्समध्ये पुन्हा एकदा ‘टशन’ निर्माण होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. उपलब्ध माहितीनुसार शाहरुख खान ‘धूम 4’मध्ये एक जबरदस्त स्टंट करणार असल्याची चर्चा आहे. झिरो चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केल्यानंतर शाहरुख धूम 4च्या शूटिंगला सुरुवात करेल असंही बोललं जात आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -