KKR11: स्पर्धक अनुष्का सेन कोरोना पॉझिटिव्ह

KKR11: स्पर्धक अनुष्का सेन कोरोना पॉझिटिव्ह

KKR11: सेटवरील स्पर्धक अनुष्का सेन कोरोना पॉझिटिव्ह

“खतरो के खिलाडी 11” च्या सिझनला छोट्या पडद्यावर धमाकेदार सुरूवात झाली आहे. सगळे स्पर्धक साउथ अफ्रीकेला रवाना झाले आहेत. स्पर्धकांच्या यादित यावेळेस दिव्यांका त्रिपाठी, विशाल आदित्य सिंह, वरुण सूद, राहुल वैद्य, अभिनव शुक्ला, अनुष्का सेन , श्वेता तिवारी या प्रसिद्ध टिव्ही स्टार झळकणार आहेत. सर्व स्पर्धक सध्या सोशल मिडियावर प्रचंड सक्रिय असून अनेक फोटो व्हीडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतात. पण मालिका सुरु होण्याआधीच मालिकेमधील लोकांवर भले मोठे संकट समोर ऊभे राहिले आहे. शो मधील स्पर्धक अनुष्का सेनचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्या अनुष्काला कोरोनाचे कोणतेही लक्षणे आढळली नाहीये. सर्व स्पर्धकांच्या सुरक्षितता लक्षात घेत त्यांना क्वारंटीईन करण्यात आले आहे.
स्पॉटबॉयच्या माहितीनुसार अनुष्काचा रिपोर्ट आल्यानंतर तिला ताबडतोब क्वारंटाइन करण्यात आले. तसेच इतर स्पर्धकांची देखिल कोरोना चाचणी करण्यात आली होती. तसेच अनुष्काला सोडून इतर स्पर्धकांचा रिपोर्ट नेगेटिव्ह आला आहे.
नुकतच अनुष्का शो मधून आउट झाल्याची माहिती समोर आली हती. पण याबाबत अद्याप अधिकृतपणे काही सांगण्यात आले नाहिये.

नुकतच सर्व स्पर्धकांनी दिग्दर्शक तसेच “खतरो के खिलाडी 11” मधील होस्ट,परिक्षक रोहित शेट्टी सोबत पोस्ट शेअर केली आहे. आता या बहुप्रतिक्षीत मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. रोहित शेट्टीने स्वतः याचा प्रोमो रिलीज केला आहे. यासोबतच लवकरच हा शो टिव्हीवर प्रसारीत होणार आहे अशी घोषणा देखिल करण्यात आली आहे


हे हि वाचा – HBD: माल्याच्या ‘कॅलेंडर गर्ल’मध्ये झळकली होती लीजा

First Published on: June 17, 2021 11:04 AM
Exit mobile version