चाहत्यासोबत चित्रपट पाहण्यासाठी क्रितीने दिली कबुली; म्हणाली…

चाहत्यासोबत चित्रपट पाहण्यासाठी क्रितीने दिली कबुली; म्हणाली…

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन नेहमीच तिच्या चित्रपटांमुळे तसेच खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. सध्या क्रिती तिच्या आगामी ‘शहजादा’ चित्रपटांमुळे चर्चेत आहे. हा चित्रपट येत्या 17 फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यात अभिनेता कार्तिक आर्यन देखील क्रितीसोबत मुख्य भूमिकेत असणार आहे. सध्या हे दोघेही त्यांच्या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. बुधवारी हे दोघेही एका कॉलेजमध्ये चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचले होते. क्रितीचा त्यावेळचा
एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात क्रितीने एका चाहत्याला त्याच्यासोबत चित्रपट पाहायला येईन अशी कबुली दिली आहे.

‘आदिपुरुष’मध्ये देखील दिसणार क्रिती

क्रिती सेनॉन आगामी काळात ‘आदिपुरुष’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. यात अभिनेता प्रभास देखील मुख्य भूमिकेत असणार आहे. शिवाय सैफ अली खान, देवदत्त नागे हे महत्त्वाची भूमिका साकारताना दिसतील.


हेही वाचा :

मी राखीशी खूप प्रेमाने…; आदिलच्या गर्लफ्रेंडने सांगितलं सत्य

First Published on: February 16, 2023 11:43 AM
Exit mobile version