मिथुन चक्रवर्तींच्या फेक अकाऊंटला अमिताभ बच्चन करतायत फॉलो; ब्लू टिकचा गोंधळ

मिथुन चक्रवर्तींच्या फेक अकाऊंटला अमिताभ बच्चन करतायत फॉलो; ब्लू टिकचा गोंधळ

इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर अनेक मोठे निर्णय घेतले. त्यांच्या नव्या धोरणामुळे ट्विटरमधील अनेक जुने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी कंपनीला सोडचिठ्ठी दिली. तसंच, नुकसान भरून काढण्याकरता एलॉन मस्कने मोठ्या प्रमाणात नोकरकपातही केली. याचं दरम्यान, त्यांनी काही दिवसांपूर्वी ब्लू टिकसाठी सबक्रिप्शनची देखील घोषणा केली होती. त्यानुसार, सुरुवातीला आयफोन युजर्ससाठी ब्लू टिक सबक्रिप्शन ऑफर देण्यात आली होती. त्यानंतर अँड्रॉइड युजर्सना देखील ब्लू टिक मिळवता येणार असल्याने सांगण्यात आले परंतु युजर्सना ब्लू टिकसाठी महिन्याला 900 रुपये मोजावे लागणार असल्याचे सांगितले.

या बातमीने अनेकजण आनंदी झाले मात्र, दुसरीकडे इलॉन मस्क यांच्या या निर्णयामुळे त्यांच्यावर खूप टीका करण्यात आली. कारण पैसे भरुन आता कोणीही सहज ब्लू टिक मिळवू शकतं. शिवाय फेक प्रोफाईल देखील व्हेरिफाइड दिसणार याबाबत अनेकांनी चिंता व्यक्त केली. दरम्यान, अशातच ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचे मैथून असं नाव असलेलं फेक अकाऊंट व्हेरिफाय झालं आहे. शिवाय त्याच अकाऊंटवर एक ट्वीट शेअर करण्यात आलंय ज्यात लिहिलंय की, “मिथुन यांचे स्वतःचे अकाऊंट व्हेरिफाय नाही, पण माझं झालं,” हे ट्वीट सध्या व्हायरल होत आहे.


हेही वाचा : 

Photo : अनंत अंबानींच्या साखरपुड्यात बॉलिवूड कलाकारांची हजेरी

First Published on: January 20, 2023 12:37 PM
Exit mobile version