९३ व्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून ‘जल्लीकट्टू’ चित्रपटाला नामांकन

९३ व्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून ‘जल्लीकट्टू’ चित्रपटाला नामांकन

९३ व्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून 'जल्लीकट्टू' चित्रपटाला नामांकन

९३ व्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून मल्याळम चित्रपट ‘जल्लीकट्टू’ला नामांकन मिळाले आहे. ‘जल्लीकट्टू’ व्यतिरिक्त इतरही अनेक चित्रपट भारतातून ऑस्करमध्ये जाण्याच्या शर्यतीत होते. यामध्ये हिंदीमध्ये ‘शकुंतला देवी’, ‘शिकारा’, ‘गुंजन सक्सेना’, ‘भोंसले’, ‘गुलाबो सिताबो’, ‘सीरियस मॅन’, ‘बुलबुल’, ‘कामयाब’ या चित्रपटांचा समावेश होता. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या १४ सदस्यांच्या कमिटीने दिग्दर्शक लीजो जोस पेलिसरी यांच्या चित्रपटाची निवड केली आहे. ‘जल्लीकट्टू’ चित्रपट सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय वैशिष्ट्य चित्रपट परदेशी भाषा विभागात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

९३ व्या ऑस्कर पुरस्कारासाठी देशभरातील एकूण २७ चित्रपट शर्यतीत होते. पण केरळमधील खेळावर असलेल्या ‘जल्लीकट्टू’ या चित्रपटाने बाजी मारली आहे. केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील वादग्रस्त खेळावर हा चित्रपट आधारित आहेत. ज्यामध्ये एका बैलाला मारण्यासाठी एका गर्दीत सोडले जाते.

यापूर्वी २०१९ मधील जोया अख्तरचा ‘गल्ली बॉय’ या चित्रपटाला २०२० साठी झालेल्या ९२ व्या ऑस्कर पुरस्कारसाठी निवडले होते. यापूर्वी रीमा दास यांचा ‘व्हिलेज रॉकस्टार्स’, अमित मसुरकर यांचा ‘न्यूटन’,वेत्रि मारन यांचा ‘विसरनाई’ आणि चैतन्य ताम्हणे यांचा ‘कोर्ट’ परदेशी भाषा विभागासाठी पाठवले होते. आतापर्यंत या विभागात कोणत्या भारतीय चित्रपटला ऑस्कर मिळाला नाही आहे.


हेही वाचा – ‘दुर्गामती द मिथ’ मध्ये भूमी पेडणेकरचा दमदार लुक


 

First Published on: November 25, 2020 4:18 PM
Exit mobile version