संजय दत्तची पत्नी मान्यता म्हणाली, ‘देव पुन्हा एकदा आमची परीक्षा घेतोय’

संजय दत्तची पत्नी मान्यता म्हणाली, ‘देव पुन्हा एकदा आमची परीक्षा घेतोय’

संजय दत्तची पत्नी मान्यता म्हणाली, 'देव पुन्हा एकदा आमची परीक्षा घेतोय'

अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे समजल्यामुळे सर्व चाहत्यांमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे. लवकरच संजय दत्त परदेशात उपचारासाठी रवाना होणार आहे. याबाबत आता संजय दत्तची पत्नी मान्यताने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

संजय दत्तच्या प्रकृतीविषयी मान्यता काय म्हणाली?

मान्यता म्हणाली की, ‘संजयच्या चांगल्या आरोग्यसाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे मी आभार मानते. या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी सामर्थ्य आणि प्रार्थनाची गरज आहे. गेल्या काही वर्षांत आमचे कुटुंब बऱ्याच अडचणीतून गेले आहे. परंतु हा काळ देखील निघून जाईल असा माझा विश्वास आहे. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे माझे संजूच्या चाहत्यांना आवाहन आहे. खूप साऱ्या प्रेमाने आणि सपोर्टने आम्हाला मदत करा.’

‘संजू नेहमीच फायटर असल्यामुळे आमच कुटुंबपण फायटर आहे. देव पुन्हा एकदा आमची परीक्षा घेत आहे. या परीक्षेला आम्ही कसे सामोरे जातो हे तो बघत आहे. आम्हाला फक्त तुमचे आशीर्वाद हवे आहेत. आम्हाला माहिती आम्ही जिंकू. जसे की आम्ही नेहमी जिंकतो. त्यामुळे या संधीचा उपयोग सकारात्मकतेचा प्रसार करण्यासाठी करूया’, अशी मान्यता म्हणाली.

८ ऑगस्ट रोजी छातीत दुखल्यामुळे आणि श्वास घेण्यास अडचण होत आल्यामुळे संजय दत्तला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण दोन दिवसात संजय दत्तला डिस्चार्ज देण्यात आला. तिथे संजयची कोरोना टेस्ट देखील झाली. त्याचे रिपोर्ट निगेव्हिट आले. घरी परतल्यानंतर संजयने कामातून ब्रेक घेणार असल्याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली. त्याने लिहिले की, ‘नमस्कार मित्रांनो, काही वैद्यकीय उपचारांसाठी मी कामापासून छोटा ब्रेक घेत आहे. माझे कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणी माझ्यासोबत असून माझ्या प्रकृतीविषयी चिंता करू नका असे आवाहन मी चाहत्यांना करतो. त्याचप्रमाणे तब्येतीविषयी काही अफवा पसरवू नका. तुमच्या प्रेमाच्या आणि शुभेच्छांच्या आधारे मी लवकरच परत येईन.’


हेही वाचा –‘तु फायटर आहेस…’; युवराजने दिला संजय दत्तला खास संदेश


 

First Published on: August 12, 2020 4:14 PM
Exit mobile version