‘त्याने आमचा पाठलाग केला नंतर १- २ तास चांगली कंपनी दिली’ गायक महेश काळेने सांगितला ‘तो’ अनुभव

‘त्याने आमचा पाठलाग केला नंतर १- २ तास चांगली कंपनी दिली’ गायक महेश काळेने सांगितला ‘तो’ अनुभव

शास्त्रीय गायनाचा झेंडा अटकेपार फडकवत संगीत कलेवर निस्सीम प्रेम असणारा तरुण गायक म्हणजे महेश काळे. महेश काळेने(mahesh kale) त्याच्या शास्त्रीय संगीताने सर्वच रसिक प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलं आहे. महेश काळेला त्याच्या गायनासाठी राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. गायक महेश काळे त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत सक्रिय असतो. महेश काळे सूर नवा ध्यास नवा(sur nava dhyas nava) या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत दिसतो आहे. त्यामुळे सॅनफ्रान्सिस्को ते मुंबई असा महेश काळेचा सतत प्रवास होत असतो. त्या प्रवासादरम्यानचे महेश काळे मिनी वलॉग्स सुद्धा आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतो. प्रवास करत असताना प्रेत्येकालाच काही न काही अनुभव येत असतात. महेश काळे सुद्धा प्रवास करताना त्याला असाच एक अनुभव आला आहे. महेश काळे प्रवास कारताना कुणीतरी त्याचा पाठलाग केला. पण नेमकं असं कोण आहे ज्याने महेश काळेचा पाठलाग केला आहे.

हे ही वाचा – छोटे ‘सूर वीर’ करणार बाप्पाचं जोरदार स्वागत!

गायक महेश(mahesh kale) काळे प्राणी प्रेमी आहे. त्याला प्राणी खूप आवडतात. महेश काळे त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सुद्धा प्राण्यांसोबतचे त्याचे फोटो शेअर करत असतो. त्याला प्राण्यांबद्दल खूप प्रेम आहे. महेश एके ठिकाणी कार्यक्रमासाठी गेला होता. तेव्हा त्याला तिथे एक श्वान भेटला. त्याच्या पायाला दुखापत झालेली असून सुद्धा तो महेश काळेचा पाठलाग केला. त्या श्वानाचे प्रेम पाहून महेश सुद्धा भारावून गेला. त्याच श्वानासोबत महेशने एक फोटो शेअर करत त्यावर एक पोस्ट सुद्धा केली आहे.

हे ही वाचा – Lata Mangeshkar Top 10 Song: सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या…लतादीदींची १० अविस्मरणीय गाणी

महेश काळे पोस्ट मध्ये म्हणाला, ‘श्वानाकडे देण्यासारखं खूप काही असतं, त्याचबरोबर त्यांच्याकडून आपण खूप काही शिकायला सुद्धा हवं. त्याच्या पायाला दुखापत झाली असतानाही कोणत्याही अपेक्षेशिवाय त्याने आमच्यासाठी प्रेम व्यक्त केलं. त्याने आधी आमचा पाठलाग केला नंतर १ ते २ तास चांगली कंपनी सुद्धा दिली’. महेश काळेच्या या पोस्ट वर अनेकांनी प्रेम व्यक्त केलं. महेश काळे नेहमीच त्याच्या पोस्टच्या माध्यमातून सक्रिय असतो.

हे ही वाचा – ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते ‘गुंजन’ आणि ‘मधुमालती’ या म्युझिक अल्बमचे लोकार्पण

First Published on: August 11, 2022 9:34 AM
Exit mobile version