घरताज्या घडामोडीLata Mangeshkar Top 10 Song: सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या...लतादीदींची १० अविस्मरणीय गाणी

Lata Mangeshkar Top 10 Song: सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या…लतादीदींची १० अविस्मरणीय गाणी

Subscribe

लता बाईंची हजारो गाणी आज चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. त्यातील काही अविस्मरणीय गाणी.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar)  यांनी वयाच्या ९३व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सहा दशके त्यांनी आपल्या गाण्यातून लाखो चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. सुरांची सुरेल देणगी लाभलेल्या लता बाईंचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी इंदौर येथे झाला. मराठी रंग भूमीवरील प्रसिद्ध गायकनट मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या त्या कन्या. वडीलांकडूनच त्यांना गायनाचे बाळकडू मिळाले. भेंडीबाजारवाले खाँसाहेब अमानअळी आणि देवासच्या रजबअली घराण्याचे अमानतखाँ यांच्याकडे लता बाईंनी शास्त्रीय गाण्याचे धडे घेतले. पहिली मंगळागौर हा त्यांचा पहिला चित्रपट. या चित्रपटातील मनू, नटली चैत्रीची नवलाई, श्रावण आला करुतरुला ही गाणी त्यांना गायली. सहा दशकात लता बाईंनी एकूण २२ भाषांमध्ये तब्बल ५० हजारांहून अधिक गाणी लता बाईंनी गायली. मराठी तसेच बॉलिवूडमधील त्यांची गाणी आजही नव्या पिढीच्या तोंडी ऐकायला मिळतात. जगात सर्वात जास्त गाणी ध्वनिमुद्रित करणारी गायिका म्हणून लता बाईंचा गौरव करण्याच आला आहे. गीनीज बुक ऑफ वर्ल्ड केकॉर्डमध्ये त्यांची नोंद आहे. लता बाईंची हजारो गाणी आज चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. त्यातील काही अविस्मरणीय गाणी.

ऐ मेरे वतन के लोगो

मेरी आवाज ही पहचान है

सागरा प्राण तळमळला

ये गलियाँ ये चौबारा

 

- Advertisement -

जिंदगी प्यार का गीत है

परदेसी या

अपके सजन सावन मैं

दिल तो पागल हैं

मेरे ख्वाबों मे जो आए

तुझे देखा तो ये जाना सनम

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या

लुका छुपी

मी डोलकर दर्याचा राजा

मी कात टाकली

घनश्याम सुंदरा


हेही वाचा –  Lata Mangeshkar:…म्हणून लता मंगेशकरांनी किशोर कुमार यांच्यासोबत रेकॉर्डिंगला दिला होता नकार

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -