महेश मांजरेकरांच्या ‘पँथर’ मधून उलगडणार ढसाळांचा जीवनपट

महेश मांजरेकरांच्या ‘पँथर’ मधून उलगडणार ढसाळांचा जीवनपट

पद्मश्री नामदेव ढसाळांचे जीवनपट 'पॅंथर'मधून

मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये सध्या बायोपिकचा ट्रेंड आहे. बायोपिकवर आधारित चित्रपटांना प्रेक्षकांचा देखील भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. हिंदी चित्रपटांमधील ‘भाग मिल्खा भाग’  असू द्या किंवा ‘मेरी कोम’, बाजीराव पेशवे यांच्या आयुष्यावर ‘बाजीराव मस्तानी’ असू द्या किंवा राणी लक्ष्मीबाईंच्या आयुष्यावर आधारीत ‘मणिकर्णिका’ चित्रपट, प्रत्येक चित्रपटाप्रती प्रेक्षकांच्या मनात उत्सूकता राहिली. या चित्रपटांवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या. हिंदू चित्रपटांप्रमाणेच मराठी बायोपिक चित्रपटांवरही प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले. ‘बालगंधर्व’, ‘लोकमान्य टिळक’, ‘सिंधुताई सपकाळ’, ‘प्रकाश बाबा आमटे’ आणि पु.ल. देशपांडे यांच्या जीवनचरित्रावर आधारीत ‘भाई’ चित्रपट प्रेक्षकांना भरपूर आवडले. त्यामुळे आता ‘भाई’ चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक महेश मांजरेकर ज्येष्ठ विद्रोही साहित्यिक पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवणार आहेत.

हेही वाचा – ‘या’ गायकाने गांजा सोडल्याने फॅन्सने केले कौतुक

चित्रपटाचे नाव ‘पँथर’ 

महेश मांजरेकर यांनी एका टीव्ही शोमध्ये या चित्रपटाविषयी माहिती दिली आहे. या शोमध्ये त्यांना बायोपिक चित्रपटासंबंधित प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी महेश मांजरेकर यांनी ढसाळ यांच्या जीवनावर चित्रपट बनवण्याची इच्छा व्यक्त केली. हा चित्रपट बनवला तर त्याचे नाव आपण ‘पँथर’ ठेवणार, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय या चित्रपटामध्ये नामदेव ढसाळ यांची व्यक्तिरेखा किशोर कदम यांनी करावी, असे आपल्याला वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. ढसाळ हे कवी होते. तसेच किशोर कदमही कवी आणि उत्तम अभिनेता आहेत. त्यामुळे ही व्यक्तिरेखा जास्त प्रभावशाली होईल, असे महेश मांजरेकर म्हणाले आहेत.

हेही वाचा – अक्षय कुमारची मुलीसोबत पतंगबाजी, Video व्हायरल

आपलं महानगरची नाशिक आवृत्ती १८ जानेवारी पासून सुरु
First Published on: January 16, 2019 8:35 PM
Exit mobile version