कॅन्सरशी झुंज देत असताना महेश मांजरेकर करत होते ‘अंतिम’ सिनेमाचे शुटींग

कॅन्सरशी झुंज देत असताना महेश मांजरेकर करत होते ‘अंतिम’ सिनेमाचे शुटींग

कॅन्सरशी झुंज देत असताना महेश मांजरेकर करत होते 'अंतिम' सिनेमाचे शुटींग

निर्माते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा अंतिम: द फाययन ट्रुथ हा सिनेमा येत्या २६ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. अंतिम या सिनेमामुळे महेश मांजरेकर चांगलेच चर्चेत आले आहेत. सिनेमात अभिनेता सलमान खान आणि आयुष शर्मा हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. सिनेमाच्या ट्रेलर लाँच वेळी महेश मांजरेकर उपस्थित होते. महेश मांजरेकर यांना कँन्सरचे निदान झाल्याचे सर्वांनाच ठावूक आहे. सिनेमाच्या ट्रेलर लाँचवेळी महेश मांजरेकरांनी त्यांच्या आजाराविषयी खुसाला केला. अंतिम सिनेमाच्या शुटींगवेळीच त्यांना कँन्सरचे निदान झाल्याचे समोर आले होते.मात्र त्यांनी अशा परिस्थितीतही अंतिम सिनेमाचे शुटींग पूर्ण केले. त्यावेळी त्यांचे ३५ किलो वजन कमी झाल्याचे देखील म्हटले.

महेश मांजरेकरांना काही महिन्यांपूर्वीच ब्लड कँन्सरचे निदान झाले. त्यानंतर त्यांनी किमोथेरपी घेतली आणि आता ते कँन्सर मुक्त झाले आहेत. या काळात महेश मांजरेकरांचे तब्बल ३५ किलो वजन कमी झाले होते. अंतिम सिनेमाचे शेवटच्या टप्प्यातील शुटींग सुरू असताना महेश मांजरेकरांना त्यांना ब्लड कँन्सर झाल्याचे समोर आले होते. मात्र त्यांनी ही बाब कोणालाही न सांगता शुटींग सुरू ठेवले. यात काळात त्यांची कँन्सरवरील किमोथेरपी सुरू होती. सिनेमाचे अंतिम टप्प्यातील शुटींग संपताच त्यांनी शत्रक्रिया केल्याचा खुसाला केला.

महेश मांजरेकर यांनी सांगितल्यानुसार, त्यांनी २ महिन्यांच्या किमोथेरपीनंतर ते कँन्सर फ्री झाले. ते म्हणाले मी स्वत:ला भाग्यवान समजतो की किमोथेरपीचा माझ्यावर चांगला इफेक्ट झाला. अंतिम सिनेमाच्या शुटींगवेळी माझी किमोथेरपी सुरू होती. त्यानंतर मी शत्रक्रिया केली. मला कँन्सरचे निदान झाले हे मला कळल्यानंतर मला कोणताही धक्का बसला नाही. मला माहिती आहे असे अनेक लोक आहेत ज्यांना कँन्सरचे निदान झाले आहे ते आजाराचा सामना करुन ही लढाई जिंकत आहेत. महेश मांजरेकरांनी पुढे असे देखील म्हटले की, या लढाईत सलमान खान आणि आयुष यांनी देखील मला मोठी साथ दिली आणि त्यामुळेच आज मी कँन्सरवर मात करू शकलो.


हेही वाचा – आलिया भट्टचा कारच्या छतावर चढून हंगामा, चाहत्यांची उडाली झुंबड

First Published on: October 26, 2021 3:00 PM
Exit mobile version