श्रेयसच्या गोड ‘आद्या’चे फोटो एकदा बघाच!

श्रेयसच्या गोड ‘आद्या’चे फोटो एकदा बघाच!

श्रेयस तळपदे

मराठी चित्रपटसृष्टीप्रमाणेच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर ज्या अभिनेत्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली, असा अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे! श्रेयस जरी हिंदी चित्रपटसृष्टीत काम करत असला तरी तो मराठी चित्रपटसृष्टीला विसरला नाहीये. त्यामुळे त्याचे फॅन आजही श्रेयसच्या प्रेमात आहेत. श्रेयस सोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह असतो. तो कायमच त्याचे सुंदर क्षण चाहत्यांबरोबर शेअर करतो. नुकतंच श्रेयसने त्याच्या लाडक्या, गोड मुलीचे अद्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

श्रेयसने ‘डॉटर्स डे’च्या निमित्ताने श्रेयसने शेअर केलेल्या फोटोमध्ये अद्याबरोबरचं हळवं नातं शेअर केलं आहे. या फोटोमध्ये श्रेयस, त्याची बायको दीप्ती आणि त्याची लाडकी लेक आद्या खूपच सुंदर दिसत आहेत. या फोटोमधून श्रेयस आणि दीप्तीचा अद्याबरोबरच बॉण्ड लक्षात येतो. श्रेयसच्या या फोटोंवर त्याच्या चाहत्यांनी भरभरून कॉमेंट्स केल्या आहेत.

सरोगसीच्या माध्यमातून झाला आद्याचा जन्म!

श्रेयस आणि दिप्तीच्या लग्नाच्या १३ वर्षांनंतर अद्याचा जन्म झाला. सरोगसीच्या माध्यमातून मे महिन्यात गोड आद्याचं तळपदेंच्या घरी आगमन झालं. मे महिन्यात श्रेयस आणि दिप्ती फिरायला निघाले असताना विमानतळावर पोहोचल्यावर सरोगसी मातेला प्रसूती कळा सुरू झाल्या. त्यामुळे त्यांनी त्वरीत हॉलिडे प्लॅन रद्द केला. दीप्ती श्रेयसप्रमाणे सनी लिऑन, तुषार कपूर, आमिर खान, शाहरूख खान, करण जोहर या सेलिब्रिटींना सरोगसीच्या माध्यमातून मूल झालं आहे.

लवकरच श्रेयस एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. श्रेयस त्याच्या आगामी ‘भैयाजी सुपरहिट’ या चित्रपटात बंगाली लेखकाच्या भूमिकेत दिसणार आहे. श्रेयस बंगाली भाषेचे धडे सध्या अभिनेत्री सेलेना जेटलीकडून घेत आहे. या दोघांनी ‘गोलमाल रिटर्न्स’ आणि ‘पेइंग गेस्ट’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं.

First Published on: September 24, 2018 7:06 PM
Exit mobile version