घरमनोरंजनकरण जोहरने केली 'तख्त' चित्रपटाची घोषणा

करण जोहरने केली ‘तख्त’ चित्रपटाची घोषणा

Subscribe

निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याने त्याच्या आगामी तख्त या चित्रपटाची घोषणा केली असून हा एक ऐतिहासिक सिनेमा आहे. २०२० साली हा चित्रपटा प्रदर्शीत होणार असून यामध्ये बॉलीवूडची तगडी स्टारकास्ट असणार आहे.

बॉलीवूडचे फिल्ममेकर करण जोहर यांनी ‘तख्त’ चित्रपटाची घोषणा केली आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या वतीने या चित्रपटाची निर्मिती करण्यात येण्यार आहे. हा चित्रपट २०२० साली प्रदर्शीत होणार आहे. या चित्रपटात बॉलीवूडच्या दिग्गज कलाकारांची फौज असणार आहे. रणवीर सिंग, करिना कपूर खान, आलिया भट्ट, विकी कौशल, भूमी पेडणेकर, जान्हवी कपूर आणि अनिल कपूर हे कलाकार ‘तख्त’ चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.

करण स्वतःच करणार दिग्दर्शन


२०१६ साली आलेल्या  ‘ए दिल है मुश्कील’ चित्रपटाचे दिग्दर्शन केल्यानंतर आता ‘तख्त’ सिनेमाचेही दिग्दर्शन करण जोहर स्वतःच करणार आहे. आपल्या या महत्त्वाकांक्षी चित्रपटाची घोषणा करणने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्टर शेअर करून केली आहे. ‘तख्त’ हा चित्रपट मुगल साम्राज्यातील कार्यकाळावर आधारीत असून ही गोष्ट ‘तख्त’ म्हणजेच सिंहासनाला केंद्रस्थानी ठेऊन दोन भावांमधील भांडणावर बेतलेली आहे. हे दोन भाऊ म्हणजे अभिनेता रणवीर सिंग आणि विकी कौशल आहेत. करिना ही रणवीर सिंगची बहिण तर आलिया ही रणवीरच्या प्रेयसीच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची गोष्ट शाहजहान आणि मुमताजच्या मुलांच्या अवतीभवती फिरते.

महत्त्वाकांक्षी ‘तख्त’

- Advertisement -

करण जोहर यांनी ट्विटरमध्ये नमूद केले की, इतिहासातील ही एक अविश्वसनीय गोष्ट आहे. राजसी मुगल सिंहासनसाठी एक महाकाव्य युद्ध यामध्ये असणार आहे. एका कुटुंबाची, लोभाची, विश्वासघाताची, प्रेमाची आणि उत्तराधिकाऱ्याची कहाणी तख्तमध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात करण जोहरच्या निर्मितीमध्ये नुकताच प्रदर्शीत झालेल्या ‘धडक’मधील अभिनेत्री जान्हवी कपूरदेखील असणार आहे. तर भूमी पेडणेकर ही पहिल्यांदा ‘केजो’ ग्रुपमध्ये सामील होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -