माझी तुझी रेशीमगाठ(majhi tujhi reshimgath) या मालिकेतील परी म्हणजेच सर्वांची लाडकी मायरा हिने आपल्या अभिनयाने सर्वांच्याच मनात घर केलं आहे. मायरा नेहमीची काही न काही कारणांमुळे चर्चेत असते. मायरा सोशल मिडीयावरून तिचे डान्स व्हिडीओ पोस्ट करत असते. शूटिंग दरम्यान सुद्धा मायाराची सेट वर मजा मस्ती सुरूच असते. इतर कलाकारांचीही मायरा(mayra waykul) म्हणजेच परी लाडकी झाली आहे. मायराने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. त्याचीच चर्चा सध्या पाहायला मिळते आहे.
हे ही वाचा – समीर-शेफालीचा एकमेकांसाठी भन्नाट उखाणा, सोशल मीडियावर चर्चा
श्रावण महिना सुरु झाला की सर्वानाच ओढ लागते ती लाडक्या बाप्पाची. लवकरच आपल्या सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. सर्वंच भक्त गणेशोत्सवाची(ganeshotsav 2022) उत्साहात तयारी करत आहेत. माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील परीला सुद्धा बाप्पाच्या आगमनाची ओढ लागली आहे. नऊवारी साडी आणि हातात बाप्पाची सुरेख मूर्ती घेऊन परीने म्हणजेच मायराने एक खास फोटो शूट केलं आहे.
—————————————————————————————————–
हे ही वाचा – ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल,’ लहानग्या परीचा आषाढी एकादशी निमित्त खास व्हिडीओ