मेकअपसाठी खर्च करायची ३ कोटी, आता याच मॉडेलवर आली टॅक्सी चालवण्याची वेळ

मेकअपसाठी खर्च करायची ३ कोटी, आता याच मॉडेलवर आली टॅक्सी चालवण्याची वेळ

अशी एक मॉडेली ही ऐकेकाळी कधी आलिशान गाड्यांमधून फिरायची, लक्जरी लाइफ जगायची. पण तिच आता टॅक्सी चालवून आपले आयुष्य जगत आहे. एक वेळ अशी होती जेव्हा तिने आपल्या कॉस्मेटिक सर्जरीवर तब्बल ३ कोटी रुपये खर्च केले होते. पण आता आर्थिक तंगीचा सामना करत आहे. स्वत: मॉडेलने याबद्दल सांगितले आहे. तिने असे म्हटले की, तिचे आयुष्य आता किती बदलले गेले आहे.

डेली स्टारला दिलेल्या एका मुलाखतीत अमेरिकन मॉडेल नेन्नेट्टे हैमंड लॉसिवायो हिने असे म्हटले की, सध्या ती रस्त्यांवरुन टॅक्सी चालवण्याचे काम करत आहे. दैनंदिन आयुष्य जगण्यासाठी लागणाऱ्या खर्चासाठी ती आता पैसे कमावत आहे. यामुळेच तिने टॅक्सी ड्रायविंगची नोकरी स्विकारली आहे.खरंतर तिची ही स्थिती नवऱ्यासोबतच्या घटस्फोटाची केस हरल्यानंतर झाली आहे.

तर नन्नेट्टे हिने असे म्हटले की, घटस्फोटानंतर त्याने माझ्याकडून सर्व कार परत घेतल्या. त्यानंतरच तिने टॅक्सी ड्रायव्हक होण्याचा निर्णय घेतला. मॉडेलने एका श्रीमंत व्यक्तीशी लग्न केले होते. त्यांचे लग्न १७ वर्ष टिकले. याच दरम्यान तिला कधीच कोणतेही काम करण्याची गरज पडली नाही. ती आपल्या नवऱ्याच्या पैशांवर आपले आयुष्य जगत होती.

तिच्याकडे महागड्या गाड्या सुद्धा होत्या. ऐवढेच नव्हे तर नन्नेट्टे फिरण्यासाठी परदेश दौरे सुद्धा करायची. बार्बी डॉल सारखी दिसण्यासाठी तिने ३ कोटी ६० लाखांचा खर्च सुद्धा स्वत:वर करत प्लास्टिक सर्जरी केली होती. परंतु घटस्फोटानंतर तिचे आयुष्यच पालटले गेले. तिच्या नवऱ्याने तिच्याकडून गाड्या, घर, बँक बॅलेन्स सर्वकाही परत घेतले. पोटगी मिळावी म्हणून तिने कोर्टात धाव घेतली. पण ती केस हरली. सध्या नन्नेट्टे एका भाड्याच्या घरात राहते.

पण आता टॅक्सी चालकाची नोकरी करत असल्याचे पाहून लोक तिला पाहून हैराण होतात. तिच्या सौंदर्याचे कौतुक केले जाते. पण लोकांना यावर विश्वास बसत नाही की, ती मॉडेल सारखी दिसणारी महिला ड्रायव्हरचे काम करतेय.


हेही वाचा- Filmfare Award पासून ‘द कश्मीर फाइल्स’ वंचित; अनुपम खेर नाराज

First Published on: April 29, 2023 5:51 PM
Exit mobile version