रंगभूमीवर मोहन जोशी साकारणार नटसम्राट

रंगभूमीवर मोहन जोशी साकारणार नटसम्राट

‘नटसम्राट’ म्हटलं की ‘कुणी घर देता का घर’ अशी आर्त साद ऐकायला येतं. एका हतबल नटाची शोकांतिका या नाटकात मांडण्यात आली आहे. नटसम्राट या नाटकाने इतिहास रचला होता. प्रत्येक मराठी रसिकांच्या मनावर आजही या नाटकाने गारूड केलं आहे. नटसम्राट हे नाटक चित्रपटरूपात प्रेक्षकांसमोर आलं. या चित्रपटात प्रमुख भुमिकेत अभिनेते नाना पाटेकर होते. आता पुन्हा एकदा हेच नाटक भव्य रूपात प्रेक्षकांसमोर येत आहे. मात्र या नाटकात आप्पासाहेब बेलवलकर या प्रमुख भुमिकेत अभिनेते मोहन जोशी दिसणार आहेत.

पुन्हा रंगभूमीवर येणार नटसम्राट

या आधी या नाटकातून जेष्ठ अभिनेते श्रीराम लागू, यशवंत दत्त, उपेंद्र दाते अशी जेष्ठ नटांनी ही भुमिका अजरामर केली आहे. लवकरच हे नाटक पुन्हा एकदा रंगभुमिवर दाखल होणार आहे. या नाटकात गणपतरावांच्या भुमिकेत मोहन जोशी तर कावेरीच्या भुमिकेत जेष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी असतील. तर ऋषिकेश जोशी यांनी दिग्दर्शनाची धूरा सांभाळली आहे. हॅम्लेट, अलबत्या गलबत्या या नाटकांच्या लोकप्रियतेनंतर झी मराठीने नटसम्राट हे नाटक रंगमंचावर आणण्याचा निर्णय घेतला आहे.

नाटकाच्या तालमीला सुरुवात

नाटकाच्या तालमीला सुरूवात झाली आहे. हे नाटक पुन्हा रंगभुमिवर येणार म्हणजे रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. दिवाळीच्या सुमारास हे नाटक प्रेक्षकांसमोर येईल. हे नाटक म्हणजे दिवाळी भेट ठरणार आहे.

हेही वाचा – मलाईकाच्या या ‘फिगर’ फोटोवर, चाहते फिदा
First Published on: October 18, 2018 6:38 PM
Exit mobile version