The Kashmir Files पाहून बॉलिवूडवर भडकले Mukesh Khanna; म्हणाले, दु:ख समजत नसेल तर …

The Kashmir Files पाहून बॉलिवूडवर भडकले Mukesh Khanna; म्हणाले, दु:ख समजत नसेल तर …

The Kashmir Files पाहून बॉलिवूडवर भडकले Mukesh Khanna; म्हणाले, दु:ख समजत नसेल तर ...

द काश्मीर फाईल्स हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतोय. काश्मीरी पंडितांची कहाणी पाहून लोक थिएटर्समध्ये रडत असल्याचे म्हटले जात आहे. सिनेमातील कलाकारही सिनेमाविषयी भरभरुन बोलत असताना बॉलिवूड मात्र कोणतेही भाष्य करण्यास तयार नाही. अशातच अभिनेते मुकेश खन्ना यांनी सिनेमावर भाष्य करत बॉलिवूडवर नाराजी व्यक्त केली आहे.

मुकेश खन्ना यांनी थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहिल्यानंतर बॉलिवूडवर राग व्यक्त केला. मुकेश खन्ना यांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे ज्यात ते प्रेक्षक सिनेमा प्रमोट करत असल्याचे म्हणत आहेत.

व्हिडीओत मुकेश खन्ना म्हणतायत, सिनेमाला प्रमोट करा. मोठ मोठे प्रमोटर्स देखील सिनेमाला प्रमोट करत नाहीत. आपल्या इंडस्ट्रीतील लोक स्वत:ला भारतापासून वेगळं समझतात. जर भारतीय लोकच दु:खच समजू शकत नसतील तर तुम्ही या देशाचे रहिवासी नाही. जर तुम्ही सिनेमा प्रमोट करत नसाल तरी पब्लिक सिनेमा प्रमोट करत आहे. जस मी आज बोलत आहे जशी पब्लिक बोलत आहे आणि सिनेमा प्रमोट करत आहे.

आता OTT प्लॅटफॉर्मवर झळकणार ‘The Kashmir Files’

मुकेश खन्ना पुढे म्हणाले, तुम्ही सिनेमाचे रिव्ह्यू पाहिले असतील. सर्वसामान्य लोक सिनेमाचे प्रमोशन करत आहे. पब्लिक सिनेमा पाहत आहेत. मला वाटते हा सिनेमा मोठा लेव्हलला ब्लॉकबस्टर व्हावा कारण हा सिनेमा एक हेतू, चुकलेले निर्णय आणि राज्य सरकारला त्यांच्या चुकांचा पडलेला विसर दाखवतो.

The Kashmir File : विवेक अग्निहोत्रीला ‘ द कश्मीर फाईल’ सिनेमा बनवण्यासाठी लागले 4 वर्ष, फतवाही काढला होता

मुकेश खन्ना यांच्या या व्हिडीओवर सर्वसामान्य लोकांनी खूप प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी व्हिडीओ शेअर करत सिनेमाला प्रमोटर्सची गरज नाही असे म्हटले आहे तर काहींनी सिनेमाकडे पब्लिक नावाचा मोठा परिवार आहे त्यामुळे त्याला बॉलिवूडची गरज नाही, असेही म्हटले आहे. पंतप्रधान मोदींनाही भावला ‘The Kashmir Files’ सिनेमा


हेही वाचा – The Kashmir Files : गोव्यासह ‘या’ राज्यांमध्ये ‘द काश्मीर फाईल्स’ टॅक्स फ्री

हेही वाचा – The Kashmir Files वरून काँग्रेसने ट्विट करत BJPवर साधला निशाणा

First Published on: March 15, 2022 5:40 PM
Exit mobile version