OTT प्लॅटफॉर्मला डंपिंग ग्राउंड म्हणतं नवाजुद्दीन सिद्दीकीने सोडलं डिजिटल वर्ल्ड

OTT प्लॅटफॉर्मला डंपिंग ग्राउंड म्हणतं नवाजुद्दीन सिद्दीकीने सोडलं डिजिटल वर्ल्ड

नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय वेबसीरिज ‘सेक्रेड गेम्स’मधून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आता ओटीटीला रामराम ठोकणार आहे. २०१८मध्ये प्रदर्शित झालेली ‘सेक्रेड गेम्स’ वेबसीरिजमधील नवाजुद्दीन सिद्दीकीच्या भूमिकेने प्रेक्षकांना भूरळ पाडली होती. तर २०२०मध्ये या वेबसीरिजच्या दुसऱ्या भागातही नवाजुद्दीनने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. पण आता नवाजुद्दीन सिद्दीकीने वेबसीरिजमध्ये काम न करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नवाजुद्दीनच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का आहे.

‘सेक्रेड गेम्स’ या लोकप्रिय वेबसीरिजनंतर नवाजुद्दीनचे काही चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाले होते. ‘रात्र अकेली है’, ‘घूमकेतू’ आणि ‘सीरियस मॅन’ अशा काही चित्रपटातून नवाजुद्दीन दिसला होता. पण गेल्या काही दिवसांपासून नवाजुद्दीन ओटीटी कंटेंटबाबत खुलेपणाने आपली नाराजी व्यक्त करत आहे. ओटीटीवरील वेबसीरिज खालच्या पातळीला जात असल्याची चिंता नवाजुद्दीनने व्यक्त केली होती. अशातच आता नवाजुद्दीनने वेबसीरिजमध्ये काम करणार नसल्याचा मोठा खुलासा केला आहे.

बॉलिवूड हंगामा या वृत्तसंस्थेच्या मुलाखतीमध्ये नवाजुद्दीन म्हणाला की, ‘ओटीटी प्लॅटफॉर्म निरर्थक शोसाठी डंपिंग ग्राउंड बनले आहे. आपल्याकडे असे शो आहेत, जे पाहण्याच्या लायकीचे नाही आहेत आणि असे काही शोचे सिक्वल आहेत, ज्यावर बोलण्यासाठी आणखीन काहीच नाही आहे. जेव्हा मी नेटफ्लिक्ससाठी सेक्रेड गेम्समध्ये काम केले, तेव्हा डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करण्यासाठी एक वेगळा उत्साह आणि आवाहने होती. पण आता हे सर्व काही राहिले नाही आहे. मोठ्या प्रोडक्शन हाउस आणि अभिनेत्यांसाठी रॅकेट झाले आहे, जे आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर सेलिब्रिटी आहेत. बॉलिवूडमधील निर्मात्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सर्व मोठ्या खेळाडूंसोबत आकर्षक सौदे केले आहेत. निर्मात्यांना अमर्यादित कंटेंट बनवण्यासाठी मोठी किंमत मिळत आहे. मात्र गुणवत्तेला मारून टाकले आहे.’

पुढे नवाजुद्दीन म्हणाला की, ‘आता मी ओटीटीवरील शो साईन करणार नाही. जर मी असे पाहणे सहन करू शकत नाही तर मी त्याच्यात काम कसे करू शकतो?’

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर लवकरच नवाजुद्दीन सिद्दीकी ‘टीकू और शेरू’मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट कंगना रनौतच्या प्रोडक्शन हाउस मणिकर्णिका फिल्म्सच्या अंतर्गत तयार होत आहे. हा एक डार्क कॉमेडी चित्रपट आहे.


हेही वाचा – Aryanला बेल मिळताच गौरीला अश्रू झाले अनावर; अक्षय-सलमानने शाहरुखला दिल्या शुभेच्छा


First Published on: October 29, 2021 2:57 PM
Exit mobile version