घरताज्या घडामोडीAryanला बेल मिळताच गौरीला अश्रू झाले अनावर; अक्षय-सलमानने शाहरुखला दिल्या शुभेच्छा

Aryanला बेल मिळताच गौरीला अश्रू झाले अनावर; अक्षय-सलमानने शाहरुखला दिल्या शुभेच्छा

Subscribe

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला कूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात जामीन मिळाला आहे. मुंबई हायकोर्टचे न्यायाधीश सांब्रे यांनी काल आर्यनच्या जामीनाला मंजूरी दिली. २ ऑक्टोबरपासून शाहरुख आणि गौरी खान मुलाला अटक झाल्यामुळे खूप अवस्थ होते. आता आर्यनला जामीन मिळाल्यामुळे खूप खुश झाले आहेत. आर्यनला जामीन मिळताच त्याची बहीण सुहान खानने इन्स्टाग्रामवर आर्यन खानसोबतचे बालपणीचे फोटो शेअर केले. तसेच शाहरुख आणि गौरी खूप भावूक झाले. बॉलिवूडमधल्या मित्र-मैत्रिणींनी आणि जवळच्या व्यक्तींनी शाहरुख आणि गौरीला फोन करून शुभेच्छा दिल्या.

आर्यन खानला जामीन मिळताच शाहरुख खानचे काही फोटो खूप व्हायरल झाले. या फोटोमध्ये शाहरुख आर्यनच्या वकिलांसोबत आणि मॅनेजर पूजा ददलानीसोबत आनंदात दिसत होता. तसेच सोशल मीडियावर काही सेलिब्रिटींनी शाहरुख आणि आर्यनसंदर्भात ट्वीट केले. एवढेच नाही तर काही सेलिब्रिटींनी शाहरुखला पर्सनली फोन करून शुभेच्छा दिल्या. यात सलमान खान, सुनील शेट्टी आणि अक्षय कुमार या नावांचा समावेश आहे.

- Advertisement -

दरम्यान जेव्हापासून आर्यन अटकेत आहे, तेव्हापासून सलमान खान तीन वेळात मन्नतवर जाऊन शाहरुख आणि त्याच्या कुटुंबियांना भेटला. तर अक्षय आणि सुनील शेट्टी सतत फोनवरून शाहरुख खानच्या कुटुंबियांची चौकशी करत आहेत. तसेच गौरी खानचे मित्र-मैत्रीणी देखील फोनवरून एकमेकांच्या संपर्कात आहे. काल, २८ ऑक्टोबरच्या रात्री जेव्हा आर्यन खानला जामीन मिळाल्याचे समोर आले तेव्हापासून शाहरुखला शुभेच्छाचे फोन येत आहेत.

खान कुटुंबियांचा निकटवर्तीयाने एका वृत्तसंस्थेशी बातचित करताना सांगितले की, ‘शाहरुखला सध्या सर्वांचे फोन येत आहेत. सलमान खान, अक्षय कुमार, सुनील शेट्टी यांनी शाहरुखला कॉल केला होता. तसेच गौरी खान मैत्रीण महीप कपूर आणि सीमा खानसोबत फोनवर बोलताना खूप रडत होती. याप्रकरणाच्या सुरुवातीपासून सीमा आणि महीपा गौरीच्यासोबत आहेत. जेव्हा आर्यन खानच्या जामिनाचा मॅसेज आला, तेव्हा गौरीला अश्रू अनावर झाले. गौरीला रडत रडत गुडघ्यावर बसून प्रार्थना करताना पाहिले गेले होते. त्यानंतर सुहानाने आर्यनच्या यूएस आणि यूकेच्या मित्रांसोबत बातचित केली आणि त्यांनी सपोर्ट केल्यामुळे आभार व्यक्त केले.’

- Advertisement -

माहितीनुसार, आर्यनला अटक झाल्यानंतर शाहरुख खान मुंबईच्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये राहत होता. एवढेच नाही तर शाहरुख आपली गाडी बीएमडब्ल्यू ऐवजी हुंडई क्रेटाचा वापर करत होता.


हेही वाचा – Cruise Drugs Case: जेलमध्ये माझ्या मुलाचे ७ किलो वजन झाले कमी, अरबाज मर्चंटच्या वडिलांची प्रतिक्रिया


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -