ड्रग्जचे आरोप होताच दियाने दिलं स्पष्टीकरण, म्हणाली!

ड्रग्जचे आरोप होताच दियाने दिलं स्पष्टीकरण, म्हणाली!

दिया मिर्झा

सुशांत सिंग राजपुत प्रकरणाचा तपास आता ड्रग्ज अँगलने केला जात आहे. NCB ची टीम या तपासात सक्रीय झाली आहे. आत्तापर्यंतच्या तपासात अनेक धक्कादायक नावं पुढे आली आहेत. काल अभिनेत्री दीपिका पदुकोणच नाव पुढे आल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला. दीपिका पदुकोणनंतर आता आणखी एक नाव समोर आलं आहे. अभिनेत्री दीया मिर्झा एनसीबीच्या रडावर आहे. मात्र कुठलीही कारवाई होण्यापुर्वीच दियाने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे

अंमली पदार्थ विरोधी पथकाद्वारे या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. या चौकशीदरम्यान सारा अली खान, रकुल प्रित सिंह, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दीपिका पदुकोण यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांची नावं समोर आली. एकूण ४० लोकांची यादी असल्याचं म्हटलं जात आहे.

आयुष्यात मी कधीडी अमली पदार्थ किंवा प्रतिबंधक पदार्थांचं सेवन केलेलं नाही. मी कायदेशीर मार्गाने या आरोपाच उत्तर देईन. मला पाठिंबा दिल्याबद्दल सर्व चाहत्यांचे मनापासून आभार. अशा आशयाचं ट्विट दियाने केलं आहे. या ट्विटद्वारे तिने होणाऱ्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

एनसीबी करत असलेल्या ड्रग्ज प्रकरणाच्या तपासादरम्यान D N S K (D म्हणजे दीपिका पदुकोण, N म्हणजे नम्रता शिरोडकर, S म्हणजे श्रद्धा कपूर आणि K म्हणजे करिश्मा) ही नावं समोर आली आहेत. एनसीबीच्या एक व्हॉट्सअॅप चॅट मिळालं आहे. यामध्ये ड्रग्जच्या खरेदी-विक्रीची चर्चा केली जात असल्याचं समोर आलं आहे. एनसीबीकडून करण्यात आलेल्या चौकशीदरम्यान मोठे गौप्यस्फोट करण्यात आले. श्रद्धा कपूरशिवाय यामध्ये तीन अन्य अभिनेत्रींची ड्रग चॅटही समोर आली आहेत.


हे ही वाचा – ‘पार्टीमध्ये ड्रग्जची केली जाते ऑफर, नकार दिल्यावर टाकला जातो बहिष्कार’


First Published on: September 22, 2020 11:33 PM
Exit mobile version