Bollywood Drug Probe: दीपिकानंतर दीया मिर्झाचं नाव आलं समोर, NCB चौकशी करणार!

Bollywood Drug Probe: दीपिकानंतर दीया मिर्झाचं नाव आलं समोर, NCB चौकशी करणार!

Dia Mirza: बाळंतपण म्हणजे मृत्यूशी झुंज! दियाने शेअर केला अनुभव

सुशांत सिंग राजपुत प्रकरणाचा तपास आता ड्रग्ज अँगलने केला जात आहे. NCB ची टीम या तपासात सक्रीय झाली आहे. आत्तापर्यंतच्या तपासात अनेक धक्कादायक नावं पुढे आली आहेत. काल अभिनेत्री दीपिका पदुकोणच नाव पुढे आल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला. दीपिका पदुकोणनंतर आता आणखी एक नाव समोर आलं आहे. अभिनेत्री दीया मिर्झा एनसीबीच्या रडावर आहे. लवकरच तिला चौकशीसाठी बोलवले जाऊ शकते.

मंगळवारी ड्रग्ज कनेक्शनच्या तपासणी दरम्यान एनसीबीला ४० वर्षीय अभिनेत्रीबद्दलही माहिती मिळाली. असे म्हटले जात आहे की सारा अली खान, दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि नम्रता शिरोडकर यांच्यानंतर दीया यांचेही नाव या प्रकरणात आले आहे. एनसीबी लवकरच त्याला चौकशीसाठी बोलवू शकेल.

एनसीबीला २०१९ मध्ये दीयासाठी खरेदी केलेल्या औषधांची माहिती आणि पुरावे मिळाले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मॅनेजरने ड्रग पेडलर्सशी एक ते दोन वेळा बैठकही घेतली होती. तर येत्या काही दिवसांत पहिल्या अभिनेत्रीच्या मॅनेजरला चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. आणि यानंतर या अभिनेत्रीला एनसीबी चौकशीलाही सामोरे जावे लागू शकते.

एनसीबीच्या पथकाने ड्रग्ज सप्लाअर राहिल राफत याला अटक केली आहे. राहिलची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. राहिलने अनेक हाय प्रोफाइल सेलिब्रिटींची नावं घेतली आहेत. बॉलिवूडमध्ये राहिलला ‘सॅम ड्रग अंकल’ म्हणून ओळखलं जातं. राहिलचा ‘बॉस’ बॉलिवूडशी संबंधित असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा बॉस अभिनेता, दिग्दर्शक किंवा निर्माता यांपैकी कोणीही असू शकतो. राहिलच्या माध्यमातून तपास यंत्रणा बॉलिवूडमधील मोठ्या नावांपर्यंत पोहचू शकतात असा एनसीबीचा विश्वास आहे. वृत्तानुसार, राहिलने एनसीबीच्या चौकशीत ज्या व्यक्तीसाठी राहिल काम करतो त्याला ‘बॉस’ या नावाने ओळखतो. ही व्यक्ती एक मोठा ड्रग्ज पेडलर असून स्वतः फिल्म इण्डस्ट्रीशी निगडीत आहे. राहिल आपल्या ‘बॉस’च्या सांगण्यावरून सेलिब्रिटींना ड्रग्ज पुरवायचा. आता दीपिका नंतर या प्रकरणात आणखी कोणती नावं समोर येणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हे ही वाचा – ‘या’ देशाची भन्नाट ऑफर; ‘लग्न करा आणि ४.२० लाख मिळवा’!


First Published on: September 22, 2020 5:47 PM
Exit mobile version