घरताज्या घडामोडी'या' देशाची भन्नाट ऑफर; 'लग्न करा आणि ४.२० लाख मिळवा'!

‘या’ देशाची भन्नाट ऑफर; ‘लग्न करा आणि ४.२० लाख मिळवा’!

Subscribe

तुम्ही लग्न करा आम्ही तुम्हाला ४.२० लाख रूपये देतो असे सरकारने सांगितलं तर. तर तुम्ही एकापायावर लग्न करायला तयार व्हाल ना. हो असा एक देश आहे, आणि ज्या देशाने आपल्या नागरिकांना ही खास ऑफर दिली आहे. आपल्या देशातील नागरिकांनी चांगल्या प्रकारे आपले संसार करावेत. त्यांचे वैवाहिक जीवन सुधारावे यासाठी ही खास ऑफर दिली आहे. यासाठी तुम्हाला आधी तुमच्या नावाची नोंदणी सरकारकडे करावी लागणार आहे.

japan marriage

- Advertisement -

जपान असे या देशाचे नाव आहे. या देशाने ही स्कीम आणली आहे कारण, जे पैसे अभावी लग्न करू शकत नाही त्यांना ही लग्न करता येणार आहे. यासाठी सरकार त्यांना नवविवाहितेचे जीवन सुरू करण्यासाठी हे पैसे देणार आहे. यासाठी त्यांना जपानच्या नवविवाहित सहाय्य कार्यक्रमात सामील व्हावे लागेल. ही मदत योजना पुढच्या वर्षी एप्रिलपासून सुरू होणार आहे.

जर लोकांनी उशीरा लग्न केले किंवा अविवाहित राहिले तर त्याचा परिणाम देशाच्या जन्म दरावर होतो. याचे निराकरण करण्यासाठी सरकारने ही योजना आणली आहे. जपान सरकारच्या कॅबिनेट कार्यालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील विवाहसोहळा वाढविण्यासाठी सरकार ही योजना चालवेल. अधिकाधिक जोडप्यांना आर्थिक सहाय्य करेल.

- Advertisement -

लग्नाच्या नोंदणीकृत तारखेनुसार पती आणि पत्नीचे वय ४० वर्षांपेक्षा कमी असावे. एकूण उत्पन्न ३८ लाख रुपयांपेक्षा कमी असले पाहिजे. या सहाय्य कार्यक्रमासाठी ते पात्र असतील. 35 वर्षाच्या वयासाठी नियम थोडे वेगळे आहेत. जर त्यांचे उत्पन्न ३३ लाख रुपये असेल तर त्यांना सुमारे २.१ लाख रुपये दिले जातील.

हा कार्यक्रम कमी जन्मदर लक्षात घेता सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. एका विवाहित जोडप्याला दोन मुले आहेत. तथापि, गेल्या वर्षी एखाद्या महिलेच्या आयुष्यात मुलाची सरासरी संख्या १.३६ होती. २०१९ मध्ये ८,६५००० मुले जन्माला आली. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ पॉप्युलेशन अँड सोसायटी सिक्युरिटी रिसर्चच्या सर्वेक्षणानुसार २०१५ मध्ये २९.१ टक्के पुरुष आणि १७.८ टक्के महिला पैशांच्या अभावामुळे लग्न करू शकली नाहीत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -