Valentine’s Day निमित्त राजकुमार रावने पत्रलेखासाठी शेअर केली खास लव्हपोस्ट

Valentine’s Day निमित्त राजकुमार रावने पत्रलेखासाठी शेअर केली खास लव्हपोस्ट

Valentine's Day निमित्त राजकुमार रावने पत्रलेखासाठी शेअर केली खास लव्हपोस्ट

अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा यांचा आज लग्नानंतरचा पहिला व्हेलंटाईन डे (Valentine’s Day) आहे. राजकुमार रावने पत्रलेखासोबत बऱ्याच कालावधीनंतर मैत्रीच्या रेशीम बंधनाचे रुपांतर लग्नबंधनात केले. राजकुमार हा पत्रलेखाला 10 वर्षापासून डेट करत होता. हे दोघेही एकमेकांसाठी मजेशीर पोस्ट टाकत असतात. व्हेलंटाइन डेच्या निमित्त राजकुमारने आणि पत्रलेखाने एक पोस्ट शेअर केली आहे.

राजकुमार राव आणि पत्रलेखाने सोशल मिडियावर पोस्ट शेअर करुन एकमेकांवरचे प्रेम व्यक्त केलं आहे. राजकुमारने इंस्टाग्रामवर एक दोघांचा एक लग्नाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघे एकमेकांकडे पाहत असून ती लाल रंगाच्या साडीमध्ये दुल्हनच्या रुपात आणि त्याने क्रिम कलरचा सदरा आणि लाल फेटा बांधला आहे. दोघेही ‘मेड फॉर इच अदर’  वाटतं आहेत. त्याने ‘आज,उद्या आणि जन्मोजन्मी सोबत असणार’, अशा आशयाचे कॅप्शन लिहिले आहे.

पत्रलेखानेही एक फोटो शेअर केला आहे. प्रेम म्हणजे चिडचिडेपणा, प्रेम म्हणजे क्रेझी  आणि हेच प्रेम जर वेडे नसले तर त्याचा काहीच अर्थ नाही’, अशा आशयाचे कॅप्शन लिहिले आहे. राजकुमार रावनेही ‘नेहमीच’ अशी तिच्या पोस्टवर कमेंट केली आहे.

 

एका मुलाखती दरम्यान पत्रलेखाने सांगितले होते की, पत्रलेखाने ‘लव्ह सेक्स और धोका’ या चित्रपटामध्ये राजकुमार रावला पाहिलं होतं. त्यामुळे पत्रलेखाला वाटलं की, चित्रपटांच्या भुमिकेनुसार राजकुमार रावचा स्वभाव थोडा विचित्र आहे,मात्र खऱ्या आयुष्यात राजकुमारचा स्वभाव वेगळा आहे. मात्र दूसरीकडे राजकुमारने एका जाहिरातीच्या दरम्यान,पत्रलेखाकडे लग्नाची मागणी घातली होती. तेव्हापासून म्हणजे 2010 पासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. 2014 मध्ये ‘सिटी लाइट’ मध्ये सोबत दिसले होते.


हे ही वाचा –  राखीचे कंगनाला चॅलेंज, म्हणाली ‘हिंमत असले तर वर्षभर तरी Lock UPP शो चालवून दाखव’


 

 

First Published on: February 14, 2022 3:09 PM
Exit mobile version