परिणीती-राघवची एप्रिलमध्ये होणार एंगेजमेंट; दिल्लीत तयारी सुरु

परिणीती-राघवची एप्रिलमध्ये होणार एंगेजमेंट; दिल्लीत तयारी सुरु

मागील काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचा खासदार राघव चड्ढा त्यांच्या रिलेशनशिपच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी या दोघांना मुंबईत एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. तेव्हापासून त्यांच्या डेटिंगच्या अनेक बातम्या सोशल मीडियावर पसरु लागल्या. गायक-अभिनेता हार्डी संधूनेही परिणीती-राघवच्या नात्याबाबत खुलासा केला होता. दरम्यान, आता हे दोघेही एंगेजमेंट करणार असल्याची बातमी समोर येत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, परिणीती आणि राघव लवकरच एंगेजमेंट करणार आहेत. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात त्यांच्या एंगेजमेंटचा मोठा सोहळा पार पडेल. दरम्यान, याबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी काहीही खुलासा केला नाही. मात्र, सूत्रांच्या मते, सध्या परिणीती आणि राघव त्यांच्या एंगेजमेंटची तयारी करत असून दिल्लीमध्ये त्यांची एंगेजमेंट पार पडणार आहे.

या चित्रपटांमध्ये दिसणार परिणीती

परिणीती आगामी काळात ‘चमकिला’ आणि ‘कॅप्सूल गिल’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. या पूर्वी परिणीती महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत उंचाई चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नव्हती.


हेही वाचा :

‘किसी का भाई किसी की जान’मधील ‘येंतम्मा’ गाणं ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

First Published on: April 4, 2023 11:01 AM
Exit mobile version