घरमनोरंजन'किसी का भाई किसी की जान'मधील 'येंतम्मा' गाणं 'या' दिवशी होणार प्रदर्शित

‘किसी का भाई किसी की जान’मधील ‘येंतम्मा’ गाणं ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Subscribe

सलमान खान आपल्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’या चित्रपटातील गाण्यांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. रोमँटिक ट्रॅक ‘नैयो लगदा’, पंजाबी डान्स नंबर ‘बिल्ली बिल्ली’, ‘फॉलिंग इन लव्ह’ आणि ‘बठुकम्मा’या गाण्यांवर सिनेप्रेमींनी प्रेमाचा वर्षाव केला. दर्शकांचा उदंड प्रतिसाद मिळत असतानाच, सलमानने आता हिंदी-तेलुगू फ्युजन असलेले सिनेमातील चौथे गाणे ‘येंतम्मा’च्या टिझरचे अनावरण केले आहे.

या टिझरमध्ये सलमान आणि व्यंकटेश लुंगीमध्ये दिसत आहेत. हिंदी-तेलुगूचे फ्युजन असलेल्या आणि जानी मास्टर यांनी कोरियोग्राफी केलेल्या ‘येंतम्मा’या गाण्याचे बोल शब्बीर अहमद यांनी लिहिले आहेत तर, पायल देव यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे. तसेच, विशाल ददलानी आणि पायल देव यांनी हे गाणे गायले असून, रफ्तारने रॅप केले आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

दरम्यान, गाण्याच्या टीझरच्या शेवटी डान्स फ्लोअरवर सलमान खान आणि व्यंकटेशसोबत एक मिस्ट्री मॅनची एन्ट्री होते. हे पाहून सर्वांना प्रश्न पडला आहे की हा मिस्ट्री मॅन राम चरण तर नाही. याआधी, हैदराबादमध्ये चित्रपटाच्या सेटवर राम चरण, सलमान आणि व्यंकटेश यांना एकत्र स्पॉट केल्याच्या चर्चा होत्या. चर्चांवर विश्वास ठेवला तर, ‘येंतम्मा’हे गाणे सलमान खान, व्यंकटेश, पूजा हेगडे आणि राम चरण यांचा एक डान्स नंबर आहे. अशातच, ‘किसी का भाई किसी की जान’मधील ‘येंतम्मा’हे गाणे 4 एप्रिल रोजी प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.

सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनचा ‘किसी का भाई किसी की जान’या सिनेमाची निर्मिती सलमान खानने केली असून, फरहाद सामजी यांनी दिग्दर्शन केले आहे. तसेच, या चित्रपटात सलमान खान, वेंकटेश दग्गुबाती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या भूमिका आहेत. अशातच, अ‍ॅक्शन, कॉमेडी, ड्रामा आणि रोमान्सने भरपूर असलेला ‘किसी का भाई किसी की जान’हा चित्रपट 2023च्या ईदला प्रदर्शित होणार असून, जगभरात झी स्टुडिओजद्वारा रिलीज करण्यात येणार आहे.


हेही वाचा :

ज्येष्ठ दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांचे नाटक लवकरच रंगभूमीवर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -