‘आदिपुरुष’विरोधात पुन्हा याचिका; सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्राशिवाय प्रोमो केला प्रदर्शित!

‘आदिपुरुष’विरोधात पुन्हा याचिका; सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्राशिवाय प्रोमो केला प्रदर्शित!

टॉलिवूड सुपरस्टार प्रभास सध्या त्याच्या आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. जेव्हापासून या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. तेव्हापासून हा चित्रपट वादात सापडला आहे. भगवान राम आणि हनुमान आणि रावण यांचे पात्र चुकीच्या पद्धतीने दाखवून हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप अनेकांनी केला होता. दरम्यान, काही दिवसांपासून हा वाद शांत झाला होता. दरम्यान, अशातच आता ‘आदिपुरुष’ चित्रपट पुन्हा चर्चेत आला आहे. खरंतर, आता‘आदिपुरुष’चित्रपटावरुन अलाहाबाद उच्च न्यायालयाने सेन्सॉर बोर्डाकडे उत्तर मागितले आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने सेन्सॉर बोर्डाकडे ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’विरोधात दाखल असलेल्या जनहित याचिकेवर उत्तर देण्याची नोटिस पाठवली आहे. चित्रपटाबाबत होणारी पुढील सुनावणी 21 फेब्रुवारी रोजी केली जाईल. दाखल याचिकामध्ये याचिकाकर्त्याने सांगितलं होतं की, चित्रपट निर्मात्यांनी सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाण पत्र घेण्याआधी ‘आदिपुरुष’चित्रपटाचा प्रोमो जाहीर केला. जे नियमांचे स्पष्टपणे उल्लंघन आहे. इतकंच नव्हे तर या याचिकेमध्ये अभिनेत्री कृती सेननने देवी सीतेच्या भूमिकेत जे वस्त्र परिधान केले त्यावर देखील आक्षेप घेतला आहे.

‘आदिपुरूष’ या 5 भाषांमध्ये होणार प्रदर्शित
ओम राउत यांच्या दिग्दर्शनात तयार करण्यात आलेल्या ‘आदिपुरूष’ चित्रपटाने प्रभास श्रीरामाच्या मुख्य भूमिकेत होता. तर सीतेच्या भूमिकेत अभिनेत्री कृति सेनन आणि सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट 16 जून 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 


हेही वाचा :

मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन अभिनेते सुनील होळकर यांचे निधन

First Published on: January 14, 2023 11:24 AM
Exit mobile version