तैमूर बर्थडे : Photo आणि Video व्हायरल

तैमूर बर्थडे : Photo आणि Video व्हायरल
नेहमीच चर्चेत राहणारा छोटा नवाब तैमुर अली खान याचा थाटच न्यारा आहे. बॉलीवूडच्या एखाद्या बड्या स्टारपेक्षाही जास्त तैमूर लाईम लाईटमध्ये असतो. प्रसारमाध्यमांचे कॅमेरेही तैमुरला नेहमीच फॉलो करत असतात. तैमुर कुठे जातो, काय करतो हे जाणून घेण्याची सर्वसामान्यांनाही उत्सुकता असते. अशा या स्टार किड तैमुरची पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चा आहे. तैमुर अली खानचा वाढदिवस २० डिसेंबरला असतो पण दोन आठवडे आधीच त्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. करिना कपूरने मुंबईमध्ये तैमुरच्या बर्थडे पार्टाचं आयोजन केलं होतं. याच बर्थडे पार्टीदरम्यानचे काही फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. जगभरातील तैमुर फॅन्स या फोटोंना भरभरुन पसंती देत आहेत. इतकंच नाही तर कमेंट्सच्या माध्यमातून लोक तैमूरवर शुभेच्छांचा वर्षावही करत आहेत. तैमुरच्या या बर्थडे पार्टीमध्ये बी-टाऊनच्या अनेक स्टार्सनी त्यांच्या मुलांसोबत हजेरी लावली होती. यामध्ये सोहा अली खान आणि तिची मुलगी इनाया खेमू, रणवीजय सिंग व त्याची मुलगी काइनाथ सिंग तसंच तुषार कपूर आणि त्याचा मुलगा लक्ष्य कपूर आदींनी हजेरी लावली होती.

पाहा; बर्थडे पार्टीतील धमाल

बर्थडे सेलिब्रेशन आधी का? 

तैमूर अली खान येत्या २० डिसेंबरला २ वर्षांचा होणार आहे. मग तैमूरचा बर्थडे जवळपास २ आठवडे आधीच का साजरा करण्यात आला? असा प्रश्न तुमच्यापैकीही अनेकांना पडला असेल. सूत्रांनुसार, करिना कपूर आणि सैफ अली खान तैमूरला घेऊन ‘न्यू इयर सेलिब्रेशन’साठी युरोपला जाणार आहेत. उपलब्ध माहितीनुसार त्यांची ही युरोप ट्रीप जवळपास १२ ते १५ दिवसांची असल्यामुळे २० डिसेंबरला बर्थडे बॉय तैमूर मुंबईत नसेल. यामुळेच करिनाने मुंबईतील आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसाठी तैमूरचा बर्थडे आधी साजरा केल्याच्या चर्चा रंगत आहेत. कारण काहीही असलं तरी, तैमूरची ही बर्थडे पार्टी उपस्थित सर्वांनी आणि स्वत: तैमूरने एन्जॉय केली असणार यात काहीच शंका नाही.

First Published on: December 9, 2018 11:03 AM
Exit mobile version