घरमनोरंजनकरिना-तैमुर 'का रे दुरावा'

करिना-तैमुर ‘का रे दुरावा’

Subscribe

प्रत्येक आईला आपला मुलगा प्रिय असतो. मुलगा म्हणजे जीव की प्राण असतानाच मुलापासून दूर जाऊन आई दुखावते. अभिनेत्री असली तरीही करिनाच्याही जीवनात हे दुःख लवकरच येणार आहे.

चित्रपटात काम न करता प्रसिद्ध झालेला तैमुर अली खान पतौडी आता लकरवच त्याचा आई पासून दुरावणार आहे. कमी वेळातच तैमुर सोशल मीडियावर फार प्रसिद्ध झाला. त्याचे फॅन्स फक्त नेटीझन्स नाही तर सामान्य जनताही आहे. जन्मल्या पासूनच मिळालेल्या प्रसिद्धीमुळे तैमुरचा भाऊलाही बाजारात आला आहे. मात्र आता तैमुर त्याच्या पुढच्या शिक्षणासाठी त्याच्या आईपासून लांब जाणार आहे. अभिनेत्री करिना कपूरलाही तैमुर लांब जाण्याचे दुःख वाटत आहे. नुकत्याच एका वृत्तवाहिनी दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने सांगितले. तैमुर पासून लांब जाण्याचा निर्णय मला जड जाणार असल्याचे ती म्हणाली.

तैमुरला का लांब पाठवणार?

तैमुर सैफ अली खान याचा मुलगा असल्याने मुळे नवाब कुटुंबातील आहे. नवाब कुटुंबामध्ये परंपरागत शिक्षण हे ब्रिटीश बोर्डिंग स्कूलमधून घेतले जाते. या शाळेमधून तैमुरचे आजोबा मनसूख अली खान पतौडी तसेच सैफ अली खान पतौडी यांनीही शिक्षण घेतले. सैफचा मुलगा इब्राहिमही या शाळेतून शिकला आहे. यासाठी आता तैमुरलाही आता पुढील शिक्षणासाठी या शाळेत जावे लागणार आहे.

- Advertisement -

काय म्हणाली करिना

“तैमुरला शिकण्यासाठी पाठवण्याचा निर्णयामुळे मला दुःख वाटत आहे. तैमुर अजूनही लहान आहे आणि खूप गोष्टी शिकतो आहे. आम्ही मनावर दगड ठेवून त्याला पाठवत आहोत. आपल्या मुलाला दूर पाठवण्याचे दूःख काय असते हे मी आता अनुभवते आहे. आम्ही या सत्यापासून लांब जाऊ शकत नाही. येत्या काही काळ मी त्याला बघू शकणार नाही. मात्र या सैफच्या निर्णयाची माहिती मला पूर्वी पासूनच होती. म्हणून आम्ही हे सत्य स्विकारणार आहोत.”- अभिनेत्री करिना कपूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -