घरमनोरंजनकरीना पाठवणार का तैमुरला बोर्डिंग स्कुलमध्ये ?

करीना पाठवणार का तैमुरला बोर्डिंग स्कुलमध्ये ?

Subscribe

माझ्यापासून तैमुर लांब जाणार ही गोष्टच माझ्यासाठी खूप त्रास देणारी आहे. पण तैमुरच्या भविष्यासाठी हा निर्णय सैफने घेतला आहे.

बी टाऊनमधील सेलिब्रिटींपेक्षा सगळ्यात जास्त स्टारडम हे एकट्या तैमुरला आहे. तैमुर जिथे जाईल तिथे त्याला पापाराझी फॉलो करतात. आणि त्याचे सुंदर फोटो लोकांपर्यंत पोहोचवतात. पण आता तैमुर कदाचित या सगळ्या स्टारडमपासून दूर जाणार आहे कारण तैमुरला बोर्डिंग स्कुलमध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कदाचित तैमुरचे लेटेस्ट फोटोज या पुढे पाहायला मिळणार नाहीत. ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल ना ?

तैमुरचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिला का? 

का घेतला निर्णय?

बाबा सैफ अली खानने हा निर्णय घेतला असल्याचे करीनाने प्रसारमाध्यमांना सांगितले असून या सैफच्या निर्णयाविरोधात जाऊ शकत नाही. माझ्यापासून तैमुर लांब जाणार ही गोष्टच माझ्यासाठी खूप त्रास देणारी आहे. पण तैमुरच्या भविष्यासाठी हा निर्णय सैफने घेतला आहे. सैफला मिळालेल्या प्रसिद्धीची मलाच भिती वाटते. कारण तो अजून दोन वर्षांचा देखील झाला नाही. पण त्याच्या मागे प्रसिद्धी माध्यमांचा असलेला गराडा नकोसा होतो. सर्वसामान्य मुलांसारखे त्याला बाहेर खेळता यावे, फिरता यावे असे मला नेहमीच वाटते. पण आता तो बोर्डिंग स्कुलमध्ये जाणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले अूसन तो ब्रिटीश बोर्डिंग स्कुलमध्ये जाणार आहे.

- Advertisement -
हे माहित आहे का?
हे नवीन आहे; बाजारात आलाय ‘तैमुर’ बाहुला

तैमुर बाहुल्यावर काय म्हणाली करीना?

बाजारात आलेल्या तैमुर बाहुल्याविषयी करीनाला विचारल्यावर ती म्हणाली की, हा प्रश्न मला विचारणार हे मला माहितच होते. इतक्या लहानवयात तैमुर सोशल मीडियावर अनेकांचा चाहता आहे. यावयात त्याचे फॅन क्लब आहेत. पण खरचं या सगळ्याचा ताण येतो. तैमुरचा बाहुला आल्यानंतर बाहुला बनवणाऱ्या माणसाला त्याच्या विक्रीतून पैसा मिळतो आहे. याचाच आम्हाला दोघांना आनंद आहे,असे ती म्हणाली.

 वाचा- जाणून घ्या कितीला विकला जातो तैमुरचा एक फोटो
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -