लोकप्रिय अभिनेते नितेश पांडे यांचा मृत्यु; इगतपुरी येथील एका हॉटेलात आढळले मृत अवस्थेत

लोकप्रिय अभिनेते नितेश पांडे यांचा मृत्यु; इगतपुरी येथील एका हॉटेलात आढळले मृत अवस्थेत

नाशिक : इगतपुरी नगर परिषद हद्दीत असलेल्या हॉटेल ड्यू ड्रॉप येते मंगळवारी रात्री मुक्कामास थांबलेले हिंदी सिनेसृष्टी व टीव्ही मालिकांमधे काम करणारे सिने अभिनेते नितेश पांडे यांचा मृत्यू झाला आहे. ‘अनुपमा ‘ मालिकेत रुपाली गांगुली हीच्या मैत्रीणीच्या पतीची भुमिका साकरणाऱ्या या कलाकारच्या मृत्युमुळे चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे.

इगतपुरी येथील ड्यु ड्रॉप हॉटेलमध्ये अभिनेते नितेश पांडे कामानिमित्त थांबले होते. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास त्यांच्या रूममध्ये हॉटेल स्टाफने फोन केला असता पांडे यांनी फोन उचलला नाही. पांडे हे काही कामात असतील म्हणून वेटरने पुन्हा रात्री पावणे बाराच्या सुमारास रूमच्या फोनवर फोन केला तसेच त्यांच्या खाजगी मोबाईलवर फोन केला. मात्र, नितेश पांडे यांनी फोन व मोबाईल दोन्ही उचलले नाही. यामुळे हॉटेल कर्मचाऱ्याला संशय आल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांनी सदर घटना हॉटेल मॅनेजर यांना सांगितली. हॉटेल मॅनेजर यांनी दुसऱ्या चावीने सदर रूमचा दरवाजा उघडला असता नितेश पांडे हे त्यांच्या बेडवर बेशुद्ध अवस्थेत आढळले.

हॉटेल व्यवस्थापनेने त्यांना इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात रात्रीच्या सुमारास दाखल केले. परंतु, इगतपुरी ग्रामीण रुग्णालय येथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सदर घटनेमुळे टीव्ही सिरीयलतसेच चित्रपट सृष्टिवर दुःखाचे डोंगर कोसळला आहे. नितेश पांडे यांचे वय अंदाजे ५२ वर्ष आहे. पांडे सातत्याने लिखाण तसेच आरामसाठी इगतपुरीत येत असत. मंगळवारी (दि.२३) रात्री त्यांच्यासोबत ही दुर्दैवी घटना घडली व हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे दुःखद निधन झाले. आज सकाळी ग्रामीण रुग्णालयात त्यांचे नातेवाईक व मित्र परीवार यांनी गर्दी केली होती. नितेश पांडे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे व त्यांचे कर्मचारी करीत आहे.

First Published on: May 24, 2023 3:34 PM
Exit mobile version