Pornography case: शिल्पा शेट्टीचा २९ पत्रकार आणि माध्यमांविरोधात बदनामीचा दावा; उद्या हायकोर्टात सुनावणी

Pornography case: शिल्पा शेट्टीचा २९ पत्रकार आणि माध्यमांविरोधात बदनामीचा दावा; उद्या हायकोर्टात सुनावणी

बातम्यांवर रोख लावणे म्हणजे प्रसारमाध्यमांच्या अभिव्यक्तीवर गदा, शिल्पाची मागणी धोकादायक...हायकोर्ट

पॉर्न फिल्मप्रकरण उघडकीस आल्यापासून अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राबाबत अनेक खुलासे होत आहेत. दरम्यान आता याप्रकरणात अडचणीत वाढ होत असतानाच शिल्पा शेट्टीने मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. २९ पत्रकार आणि माध्यमांविरोधात बदनाम केल्याचा दावा शिल्पाने केला आहे. चुकीच्या पद्धतीने बातम्या देऊन प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत २९ पत्रकार आणि माध्यमांविरोधात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उद्या, शुक्रवारी मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे.

शिल्पाने या याचिकेद्वारे माध्यमांवरील प्रतिमा मली करणाऱ्या बातम्यांना आळा घालण्याची मागणी केली आहे. या याचिकेत अनेक उदाहरण शिल्पाने दिली आहेत. पॉर्न फिल्मप्रकरणात तिचा सहभाग असल्याबाबत आणि तिने याप्रकरणाच्या तपासावर प्रतिक्रिया दिल्याबाबतच्या चुकीच्या बातम्यांचे उदाहरण तिने सादर केले आहेत. याचिकेद्वारे शिल्पाने माध्यमाकडे माफीची मागणी केली असून २५ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यास सांगितले आहे. तसेच बदनामी करणाऱ्या बातम्या सर्व ताबडतोब काढून टाकाव्यात, अशी विनंती याचिकेच्या माध्यमातून केली आहे.

यापूर्वी काल, बुधवारी मुंबईच्या एस्प्लेनेड कोर्टाने (Mumbai’s Esplanade Court) पॉर्न फिल्मप्रकरणी अटकेत असलेल्या राज कुंद्रा आणि रयान थोरपे या दोघांचा जामीन अर्ज फेटाळला. राज कुंद्रा हा साक्षीदारांना प्रभावित करू शकतो असा युक्तीवाद पोलिसांनी कोर्टात केला. या युक्तीवादाच्या आधारे राज कुंद्राचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला. मंगळवारी राज कुंद्राला याप्रकरणी किला कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.


हेही वाचा – Pornography Case: शर्लिन चोप्राचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला, राज कुंद्राविरोधात देणार जबाब?


First Published on: July 29, 2021 8:33 PM
Exit mobile version